एक्स्प्लोर
क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर 'या' पाच गोष्टी कधीच करू नका; अन्यथा बसेल फटका
Credit Cart : अनेकजण क्रेडिट कार्डचा वारेमाप वापर करतात. मात्र क्रेडिट कार्डचा वापर करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

credit card best use (फोटो सौजन्य- META AI)
1/6

अनेकजणांकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स असतात. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स असतील तर तुम्हाला वापरायला मिळणआऱ्या पैशांची मर्यादा वाढते. मात्र क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर केल्यास तुमचा सिबिल स्कोअर हा घटू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड असेल तर खालील पाच गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
2/6

तुम्ही क्रेडिट कार्डवरून काही खरेदी केले असेल तर ड्यू डेटकडे खास लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही ड्यू डेटच्या अगोदर पैसे जमा न केल्यास तुम्हाला विलंब शुल्क लागू शकते. ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो.
3/6

क्रेडिट कार्डचा वापर करताना क्रेडिट युटिलाइझेशन रेशोकडे लक्ष ठेवले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर लिमिटच्या 30 टक्केपेक्षा अधिक करू नये. तसे केल्यास तुमचा सिबिल स्कोअर प्रभावित होऊ शकतो.
4/6

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल त्यासाठी तुम्हाला वार्षिक फी द्यावी लागते. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक कार्ड्स असतील तर तुम्हाला द्यावी लागणारी वार्षिक फीदेखील अधिक असेल. त्यामुळे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स असतील तर ते बंद करावेत.
5/6

क्रेडिट कार्डचा वापर करताना मिनिमम ड्यूच्या मोहात पडू नये. कारण मिनिमम ड्यूच्या माध्यमातून तुम्ही आता कमी पैसे दिले तरी भविष्यात तुमच्या डोक्यावरचा आर्थिक भार वाढू शकतो. ड्यू डेट चुकली तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. अशी परिस्थिती उद्भवल्यास तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो.
6/6

क्रेडिट कार्डचा वापर केल्यास रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स असतील तर रिवॉर्ड पॉइंट्सचा हिशोब ठेवणे कठीण होऊ शकते. काही रिवॉर्ड पॉइंट्स तर निश्चित कालांतराने बंदही होऊन जातात. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करून घ्या अन्यथा ते तसेच एक्सपायर होतील.
Published at : 23 Sep 2024 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
