एक्स्प्लोर
बाईक चालवताय? 'ही' पाच कागदपत्रं सोबत असायलाच हवीत, अन्यथा होऊ शकते अडचण!
प्रत्येकालाच बाईक चालवायला आवडते. पण बाईक चालवता काही काळजी घेणे गरजेचे आहे. बाईक चालवत असाल तर सोबत काही कागदपत्रं असणं गरजेचं आहे.

bike document (फोटो सौजन्य- Meta AI)
1/5

तुम्ही बाईकने कुठे प्रवास करत असाल तर तुमच्याकडे सोबत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. आरसी बूकमध्ये रजिस्ट्रेशन नंबर, बाईकचे मॉडल तसेच मालकाचे नाव दिलेले असते.
2/5

तुम्ही बाईकने प्रवास करत अशाल तर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. हे कागदपत्र आरटीओ द्वारे दिले जाते. हे कागदपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर चाचणी द्यावी लागते.
3/5

सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाचा विमा काढलेला असणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या विम्याच्या कागदपत्रात वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, विमा कंपनीचे नाव, विमा कव्हरेजचा प्रकार, विम्याचा कालवधी आदी माहिती असते.
4/5

वाहन चालवताना संबंधित वाहनाचे इमिशन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. या कागदपत्रात तुमचे वाहन किती प्रदूषण करते, याची माहिती दिेलेली असते. हे कागदपत्र वेळोवेळी अपडेट करावे लागते.
5/5

तुमच्याकडे बाईक असेल तर त्या बाईकचे फिटनेस सर्टिफिकेट तुमच्याजवळ असायला हवे. प्रत्येक बाईक चांगल्या पद्धतीने 15 वर्षांपर्यंत काम करू शकते. तुम्ही 15 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली बाईक चालवत असाल तर बाईकचे फिटनेस सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
Published at : 15 Jul 2024 04:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion