एक्स्प्लोर
पेन तयार करणाऱ्या 'या' स्टॉककडे दिग्गजांची नजर! गुंतवणूक करून तुम्हीही होऊ शकता मालामाल!
शेअर बाजारात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधीकधी क्षणात एखाद्या कंपनीच्या समभागांचे मूल्य वाढते. तर कधी त्याच कंपनीचे शेअर्स गटांगळ्या खायला लागतात.

सांकेतिक फोटो (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/10

शेअर बाजारात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधीकधी क्षणात एखाद्या कंपनीच्या समभागांचे मूल्य वाढते. तर कधी त्याच कंपनीचे शेअर्स गटांगळ्या खायला लागतात.
2/10

त्यामुळे परताव्याची हमी देणाऱ्या कंपनीतच गुंतवणूक करणे योग्य असते. एखाद्या कंपनीचा नीट अभ्यास करून, त्या कंपनीचे उत्पादन, विक्रीची स्थिती समजून घेऊनच आपण शेअर्स खरेदी केले पाहिजेत.
3/10

दरम्यान, सध्या शेअर बाराजात पैसे कमावण्याच्या दृष्टीने पेन तयार करणाऱ्या शेअरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4/10

शेअर बाजारातील एक्स्पर्ट संदीप जैन यांनीच या पेन तयार करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असे सांगितले आहे.
5/10

जैन यांनी Linc Ltd या पेन तयार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अल्प किंवा दीर्घकाळासाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे योग्य राहील असे जैन यांना वाटत आहे.
6/10

या कंपनीचा शेअर चक्क 900 रुपयांपर्यंत वर गेलेला आहे. सध्या त्याचे मूल्य 598 रुपये आहे. आजदेखील बाजार चालू असताना हा शेअर कालच्या तुलनेत 7 टक्के तेजीत होता.
7/10

शुक्रवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी हा शेअर 555.60 रुपयांवर बंद झाला होता. या कंपनीच्या उत्पादनांची निर्यात 50 देशांमध्ये होते.
8/10

या कंपनीचे डिस्ट्रिब्यूटन नेटवर्कसुद्धा चांगले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत बऱ्याच कंपन्यांचे आयपीओ आलेले आहेत. या कंपन्या ज्या क्षेत्रात काम करतात ते क्षेत्रदेखील लिंक लिमिटेड या कंपनीच्या उत्पादनाशी निगडीत आहे. त्यामुळे आघामी काळात ही कंपनी चांगला परतावा देऊ शकते.
9/10

गेल्या तीन वर्षांत या कंपनीच्या नफ्यात 25-26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.या कंपनीत प्रमोटर्सचे शेअर्स हे ६० टक्के आहेत.
10/10

(हा लेख इंटरनेवर असलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे थेट गुंतवणूक करण्याआधी या श्रेत्रातील तज्ज्ञांशी एकदा चर्चा जरूर करा)
Published at : 08 Apr 2024 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
