एक्स्प्लोर
Share Market Closing Bell: सेन्सेक्सची ऐतिहासिक उसळण; गुंतवणूकदारांची दिवाळी; शेअर बाजारात आज काय घडलं?
शेअर बाजारात आज चांगलीच तेजी दिसून आली. बाजारात दिसून आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगलीच भर पडली.
Share Market Closing Bell: सेन्सेक्सची ऐतिहासिक उसळण; गुंतवणूकदारांची दिवाळी; शेअर बाजारात आज काय घडलं?
1/9

भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.
2/9

सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सर्वकालिक उच्चांक गाठला.
3/9

बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने 65000 अंकांचा टप्पा पहिल्यांदाच गाठला.
4/9

आज बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 486 अंकांच्या तेजीसह 65,205 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 15 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले.
5/9

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 134 अंकांच्या तेजीसह 19,322 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 24 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले.
6/9

बँक निफ्टी निर्देशांकानेदेखील 45000 अंकांचा टप्पा गाठला. बँक निफ्टी 45,158 अंकांवर बंद झाला.
7/9

आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल 298.21 लाख कोटी रुपयांवर गेले.
8/9

ऑटो, आयटी, फार्मा, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू आदी सेक्टरमधील शेअर्स घसरणीसह बंद झाले.
9/9

शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Cap) वाढ झाली. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.76 लाख कोटींची उसळण दिसून आली.
Published at : 03 Jul 2023 04:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























