यानंतर तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने केला जाणार आहे.
2/13
यंदाची कार्तिकी यात्रा कोरोना काळात होत असल्याने अनेक निर्बंध असणार आहेत.
3/13
यावेळी मंदिरात पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत विठूरायाची महापूजा होणार असून यानंतर दोन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत रुक्मिणी मातेची महापूजा होईल.
4/13
दरवेळी कार्तिकी महापूजेच्या वेळी दोनशेपेक्षा जास्त व्हीआईपी गर्दी करीत असतात.
5/13
कार्तिकी सोहळ्यानिमित्त पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिराला फुलांची आरास केली आहे. या फुलंही सॅनिटाईझ करून घेण्यात आली आहेत.
6/13
मंदिरातही सारखे सॅनिटायझेशनचे काम केले जात आहे.
7/13
कार्तिकी सोहळ्यात कोरोनाच्या धोक्यामुळे मंदिर समिती अध्यक्ष, अधिकारी, पुजारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
8/13
पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मंदिर समिती सहअध्यक्ष व इतर असे एकूण 25 जणांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
9/13
अजित पवार जेथे पूजेचा संकल्प सोडतील त्या चौखांबीमध्ये अजित पवार कुटुंबासह केवळ पुजारी व मानाचे वारकरी अशा आठच लोकांना प्रवेश असेल.
10/13
उद्या पहाटे दोन वाजता अजित पवार सपत्नीक विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेसाठी येतील.
11/13
पूजेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबीय, मानाचा वारकरी दाम्पत्य यांच्यासह केवळ मोजके अधिकारी व पालकमंत्री कुटुंब अशा 28 व्हीआयपीना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
12/13
कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी अतिशय मोजक्या लोकांना प्रवेश दिला जाणार आहे.
13/13
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.