एक्स्प्लोर
Vastu Tips : देव्हाऱ्यात चुकूनही ठेवू नका 'या' 5 गोष्टी; आर्थिक अडचणी येतील चालून, आरोग्यावर होईल विपरीत परिणाम
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरातील देव्हाऱ्यावर काही वस्तू ठेवल्याने व्यक्तीला जीवनात नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागतो, विविध मार्गाने व्यक्तीच्या खिशालाही झळ बसते.
Vastu Tips
1/10

वास्तुशास्त्रानुसार, देवाच्या रुद्र स्वरूपाची मूर्ती घरच्या देव्हाऱ्यात चुकूनही ठेवू नये.
2/10

खराब झालेली, तुटलेली मूर्ती किंवा फोटो देखील देव्हाऱ्यात ठेवू नये, अशा मूर्ती देव्हाऱ्यात ठेवल्याने आर्थिक चणचण वाढते.
3/10

तुम्हाला जर शिवलिंग देव्हाऱ्यात ठेवायचं असेल तर ते अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचं असू नये.
4/10

देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख ठेवू नये, अन्यथा याचा आरोग्यावर परिणाम होतो.
5/10

फाटलेली धार्मिक पुस्तकं देव्हाऱ्यात ठेवल्याने देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे मंदिरात अशी धार्मिक पुस्तकं ठेवू नये.
6/10

देव्हाऱ्यात सुकलेली फुलं अजिबात ठेवू नये.
7/10

याशिवाय घरातील देव्हाऱ्यात कात्रीसह इतर तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत. तीक्ष्ण वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
8/10

अनेकांना देव्हाऱ्याच्या वर काही वस्तू ठेवण्याची सवय असते, जसं की, कुंकू, हळद, अगरबत्ती किंवा बंद पणत्या, तर या गोष्टी टाळाव्या. देवाच्या डोक्यावर जास्त गोष्टी ठेवू नये.
9/10

घरातील देवांची दररोज न चुकता पूजा करावी, तरच घरात सुखसमृद्धी टिकून राहते.
10/10

देव्हाऱ्यावर किंवा देवाच्या फोटोंवर धूळ साचू देऊ नये, ते वारंवार स्वच्छ करावे.
Published at : 08 Oct 2024 01:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























