एक्स्प्लोर
Lucky Number : नव्या वर्षात 2023 मध्ये तुमचा लकी नंबर कोणता? कुणाचं भाग्य उजळणार?
Lucky Number for 2023 : नवीन वर्ष अनेक राशींसाठी 2023 खूप भाग्यवान ठरणार आहे. राशीनुसार तुमच्यासाठी कोणता अंक लंकी म्हणजे भाग्यवान आहे ते जाणून घ्या.

Numerology for New Year 2023 Lucky Number for New Year 2023
1/12

मेष : 2023 मध्ये 7 आणि 9 अंक मेष राशीसाठी खूप लकी असणार आहेत. हे लकी नंबर तुमच्यासाठी यशाची दारे खुली करतील. नवीन वर्षात या तारखांना तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता, तुम्हाला यश मिळेल.
2/12

वृषभ : नवीन वर्षात वृषभ राशीच्या लोकांसाठी 5 आणि 6 हे अंक लकी ठरणार आहेत. हे दोन्ही अंक तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करतील. 5 आणि 6 अंकामुळे नवीन वर्षामध्ये तुमचे भाग्य उजळेल.
3/12

मिथुन : 2023 मध्ये मिथुन राशीसाठी शुभ अंक 5 आणि 6 आहेत. या तारखांच्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता किंवा महत्त्वाची कामे करु शकता.
4/12

कर्क : 2023 वर्षामध्ये 2 आणि 6 अंक कर्क राशीसाठी खूप भाग्यवान आहेत. या दोन नंबरवर तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम करू शकता.
5/12

सिंह : नवीन वर्षासाठी या राशीसाठी भाग्यवान अंक 1 आणि 7 आहेत. हे अंक तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतील आणि भाग्य तुम्हाला साथ देईल.
6/12

कन्या : कन्या राशीसाठी 2023 वर्षात 1, 6 आणि 7 हे अंक लकी आहेत. हे अंक तुम्हाला नवीन वर्षात सुख, समृद्धी आणतील.
7/12

तूळ : तूळ राशीसाठी नवीन वर्षामध्ये 8 आणि 1 हे अंक भाग्यवान ठरणार आहेत. या तारखांना तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता किंवा नवीन वस्तू खरेदी करू शकता.
8/12

वृश्चिक : नवीन वर्षात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 1, 3, आणि 7 हे अंक सर्वात भाग्यवान ठरणार आहेत. या तारखांना तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.
9/12

मकर : मकर राशीसाठी नवीन वर्षात 3, 4 आणि 9 हे लकी आकडे ठरणार आहेत. हे आकडे तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना आणि समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला मदत करतील.
10/12

कुंभ : नवीन वर्षात कुंभ राशीच्या लोकांसाठी 3, 7 आणि 9 हे शुभ अंक आहेत. यामुळे तुम्हाला नवीन वर्षात यश तर मिळेल. या तारखांना इच्छित कार्य पूर्ण होऊन तुम्हाला उत्पन्नाची नवीन साधने मिळतील.
11/12

मीन : मीन राशीच्या लोकांसाठी 2023 या नवीन वर्षात 3 आणि 9 अंक भाग्यवान आहे. हे अंक तुम्हाला तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात मदत करतील.
12/12

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 31 Dec 2022 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
विश्व
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
