एक्स्प्लोर
Hartalika 2024 : आज हरितालिकेच्या दिवशी 'या' वस्तूंचं करा दान; पतीचं प्रेम वाढेल, वैवाहिक जीवनातही येईल गोडवा
Hartalika Teej 2024 : हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.

Hartalika Teej 2024
1/7

हरितालिकेचा शुभ दिवस आज देशभरात साजरा केला जातोय. हिंदू धर्मात या दिनाचं फार महत्त्व आहे.
2/7

या खास दिवशी महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करतात.
3/7

या दिवशी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं दान करणं फार शुभ मानलं जातं. हरितालिकेच्या दिवशी महिलांनी व्रताबरोबरच काही गोष्टींचं दान करणं महत्त्व आहे.
4/7

या दिवशी महिलांनी दानात मेहंदी, टिकल्या, बांगड्या, कुंकू, कलश, काजळ, कंगवा, चंदन यांसारख्या श्रंगारिक वस्तूंचं दान करणं फार शुभ मानलं जातं.
5/7

हरितालिकेच्या दिवशी या सर्व वस्तूंचं दान केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेमभाव वाढतो.तसेच, दोघांमधील नातं अधिक मजबूत होतं. त्याचबरोबर दाम्पत्य जीवन सुखी राहते.
6/7

असे केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांची सदैव कृपा राहते.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 06 Sep 2024 09:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
