एक्स्प्लोर
Budh Uday: बुध ग्रहाचा आज मेष राशीत प्रवेश; 'या' राशींसाठी लाभदायी
Mercury in Aries: 10 मे रोजी म्हणजेच, आज रात्री 12:53 वाजता बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत बुधाचा उदय तीन राशींसाठी खूप शुभ परिणाम घेऊन आला आहे.

Budh Uday 2023
1/8

ज्योतिषशास्त्रात, बुध हा ग्रहांचा राजा मानला जातो. जे बुद्धिमत्ता, वाणी आणि तर्काचे कारक आहेत. बुधाच्या राशीतील बदलांचा सर्व राशींवर परिणाम होतो. आज मेष राशीमध्ये बुध आपल्या निर्धारित अवस्थेतून बाहेर पडून वर येणार आहे.
2/8

10 मे रोजी म्हणजे आज रात्री 12:53 वाजता बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. याचा या तीन राशींवर विशेष परिणाम होईल.
3/8

मिथुन रास : मेष राशीत बुधाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. तुम्ही स्वतःला अधिक सामर्थ्यवान समजाल आणि जीवनात आनंदी राहाल. तुम्ही तुमच्या कुशाग्र बुद्धीच्या बळावर योग्य निर्णय घेऊन अनेक महत्त्वाची कामं मार्गी लावाल. करिअरच्या दृष्टीने मेष राशीमध्ये बुधाचा उदय तुमच्यासाठी खूप चांगले परिणाम देईल.
4/8

मेष राशीत बुधाच्या आगमनानं तुम्हाला नवीन आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील. तुमच्या कामातही तुम्हाला पूर्ण समाधान मिळेल. व्यावसायिक जीवनात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात वेगानं पुढे जाल. व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील आणि तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक बळकट होईल.
5/8

सिंह राशीच्या लोकांना जीवनाच्या विविध क्षेत्रात नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वेगळ्या विचारसरणीमुळे तुमची कोणत्याही क्षेत्रास वेगानं भरभराट होईल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धा मिळू शकते. पण तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन यशस्वी होऊ शकता.
6/8

सिंह राशीच्या लोकांना या काळात चांगले आर्थिक लाभ मिळतील, परंतु यावेळी तुम्ही कोणतीही मोठी गुंतवणूक करणं टाळा. बुधाचा उदय रिलेशनशिपच्याबाबतीत तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मनमोकळेपणानं बोलाल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकते. आरोग्य सामान्य राहील.
7/8

कुंभ राशीच्या लोकांसाठी मेष राशीत बुधाचा उदय तुमच्यासाठी चांगला परिणाम घेऊन आला आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बढती आणि प्रोत्साहन मिळेल. तसेच, तुम्हाला कामाच्या संदर्भात बाहेरगावी जाण्याचा योग येईल. या काळात काही लोकांना परदेशात जाण्याचीही संधी मिळेल. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
8/8

तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना अगदी सहज मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी स्पर्धा देखील द्याल. जर तुम्ही परदेशात बिझनेस करत असाल तर तुम्हाला या काळात खूप फायदा होईल. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल, परंतु यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.
Published at : 10 May 2023 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
कोल्हापूर
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
