Onion : नाफेडकडून अद्यापही बाजार समितीत कांद्याची खरेदी नाही
उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आश्वासन देऊनही बाजार समितीमध्ये अद्याप नाफेडकडून (Nafed) कांद्याची खरेदी सुरु झालेली नाही.
Written By : abp majha web team | Updated at : 10 Mar 2023 12:48 PM (IST)
Agriculture News Onion
1/10
कांद्याच्या दरात (Onion Price) घसरण झाल्यामुळं शेतकरी (Farmers) सध्या अडचणीत सापडला आहे. मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
2/10
राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आश्वासन देऊनही बाजार समितीमध्ये अद्याप नाफेडकडून (Nafed) कांद्याची खरेदी सुरु झालेली नाही.
3/10
उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन हवेतच विरलं की काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
4/10
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन देऊन सहा दिवस उलटून गेले. तरीही अद्याप बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नाही.
5/10
सध्या कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
6/10
कांद्याला कमीत कमी प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांचा दर अपेक्षीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन हजार रुपयांचा दर मिळाला तरच शेतकऱ्यांच्या हातात थोडेफार पैसे राहतील असे शेतकरी म्हणाले.
7/10
गेल्या महिन्याभरापासून शेतखऱ्यांच्या कांद्याची विक्री सुरु आहे. मात्र, अद्यापही दरात वाढ झाली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
8/10
विधामंडळाच्या अधिवेशनात (Budget Session) कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं
9/10
बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे (Onion buying centers) सुरु करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आले.
10/10
अद्याप नाफेडकडून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नसल्याची स्थिती दिसत आहे. सध्या महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडकडून कांद्याची खरेदी सुरु आहे.