एक्स्प्लोर
PHOTO : फुलांनी फुलली अंबानगरी; अनोखं पुष्पप्रदर्शन पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा...
Amravati Flower Unique floral display see beautiful photos
1/11

अंबानगरी अर्थात अमरावतीमध्ये पुष्पप्रेमींची संख्या काही कमी नाही.
2/11

घराच्या बागेत, गॅलरीत, गच्चीत, अगदी छोट्याश्या खिडकीतही अनेक मंडळी हौसेने फुलझाडे लावतात.
3/11

परंतु हा आनंद फक्त आपल्या घरच्या बगिच्यापुरता मर्यादित न राहता सर्व अमरावतीवासीयांना मिळावा या उद्देशाने या प्रदर्शनाचं आयोजन केलंय.
4/11

विश्वभारती पब्लिक स्कुलच्या प्रांगणात अमरावती गार्डन क्लबच्या वतीने प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
5/11

ही पुष्पप्रदर्शनासह एक स्पर्धा असल्याचं आयोजक सांगतात.
6/11

यात अँडेनियम, सिझनल फ्लॉवर्स, कॅकटस, सक्युलँट, बोन्साय, प्लांटस ऑन मॉस स्टीक, फोलिएज, हँगिंग बास्केट यासह विविध गटांचा समावेश आहे.
7/11

अमरावतीच्या इर्विन चौकातील विश्व भारती पब्लिक स्कूल परिसरात हे प्रदर्शन आहे.
8/11

काल 19 आणि आज 20 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
9/11

प्रदर्शनातील विविध जातीचे फुलं बघताक्षणीच सर्वांचे मन मोहून घेतात.
10/11

या प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
11/11

अमरावतीमध्ये सध्या या प्रदर्शनाची मोठी चर्चा आहे.
Published at : 20 Feb 2022 08:41 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर























