एक्स्प्लोर

'झेरोधाचे' कामथ बंधू बनले 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत भारतीय

IIFL Wealth Hurun India तर्फे दरवर्षी स्वत:च्या हिंमतीवर श्रीमंत झालेल्या 40 वर्षाखालील भारतीयांची यादी प्रसिध्द केली जाते.यावर्षी 1 हजार करोडपेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांचा या यादीत समावेश

मुूंबई: IIFL Wealth Hurun India ने जाहीर केलेल्या 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंतांच्या यादीत भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी असलेल्या झेरोधाचे संस्थापक नितिन कामथ आणि निखिल कामथ या कामत बंधूंचा समावेश आहे. त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती ही 24 हजार करोड इतकी आहे.

The IIFL Wealth Hurun India तर्फे दरवर्षी भारतातील 40 वर्षाखालील स्वत:च्या हिंमतीवर अब्जाधीश झालेल्या युवा उद्योगपतींची यादी जाहीर केली जाते. यावर्षी या यादीत 1000 करोड रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांचा समावेश आहे.

कामत बंधूनी 2010 साली झेरोधा या भारताच्या पहिल्या स्टॉक ब्रोकरेज कंपनीची स्थापना केली. दहा वर्षाच्या कालावधीत त्यांची ही कंपनी भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी बनली.

झेरोधा कंपनीतर्फे इक्विटी, बॉंडस्, करंसी, कमोडिटी आणि म्युच्युअल फंडचे व्यवहार केले जातात. यात गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदाराला 330 रूपये गुंतवून अकाउंट काढावे लागते. यातील इक्विटी गुंतवणूक मोफत आहे. या कंपनीत प्रत्येक महिन्याला जवळपास 2 लाख अकाउंट काढले जातात.

या यादीतील इतर अब्जाधीश या यादीत दुसऱ्या क्रमांकावर Media.net चे मालक दिव्यांक तुकखिया हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 14,000 करोड इतकी आहे तर तिसऱ्या क्रमांकावर उडान या कंपनीचे मालक अमोद मालवीय यांचे नाव आहे. त्यांची संपत्ती 13.1 हजार करोड इतकी आहे. बायजू या ऑनलाईन एज्युकेशन देणाऱ्या अपचे मालक रिजू रविंद्रन यांनी त्यांच्या 7800 करोड संपत्तीसह या यादीत सहावे स्थान पटकावले आहे.

या यादीत फ्लिपकार्ट च्या बिन्नी बंसल यांचे नावही सातव्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती ही 7,500 हजार करोड इतकी आहे तसेच त्यांचे भागिदार असणाऱ्या फ्लिपकार्टच्या सचिन बंसल यांचीही तितकीच संपत्ती आहे. 2019 सालच्या यादीत सर्वात तरुण अब्जाधीश ठरलेले ओयोचे संस्थापक रितेश अगरवाल हे आता या वर्षीच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती तब्बल  3000 करोडने घटून 4500 करोड इतकी झाली. त्यांच्या संपत्तीत एकूण 40 टक्क्यांची घट झाली आहे.कोरोनाचा फटका त्यांच्या व्यवसायाला झाला असल्याचे स्पष्ट दिसते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 
एचडीएफसी बँकेला सेबीनं फटकारलं, नेमकं कारण काय? आवश्यक ती पावलं उचलू, बँकेनं कळवलं
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 17 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सOne Nation One Election : कसा होणार एक देश-एक निवडणूक चा प्रवास ?Chhagan Bhujbal On NCP | जहाँ नहीं चैना, वहा नहीं रूकना, छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 
एचडीएफसी बँकेला सेबीनं फटकारलं, नेमकं कारण काय? आवश्यक ती पावलं उचलू, बँकेनं कळवलं
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget