एक्स्प्लोर

Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींना राज्यसभा मिळायला हवी होती, झिशान यांची सिधी बात, आता कोणत्या पक्षात, थेट सांगितलं!

Zeeshan Siddique :  "बाबा राज्यसभेवर जावे ही माझी देखील इच्छा आहे.  मी सध्या तरी कोणत्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. मी सध्या काँग्रेसमध्येच आहे", असे काँग्रेस नेते झिशान सिद्दिकी म्हणाले आहेत. यावेळी बोलताना सिद्दिकी यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा पाढाच वाचला आहे.

Zeeshan Siddique :  "बाबा राज्यसभेवर जावे ही माझी देखील इच्छा आहे.  मी सध्या तरी कोणत्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. मी सध्या काँग्रेसमध्येच आहे", असे काँग्रेस नेते झिशान सिद्दिकी म्हणाले आहेत. यावेळी बोलताना सिद्दिकी यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा पाढाच वाचला आहे. बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर झिशान कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, अजूनही काँग्रेसमध्येच आहे, असे झिशान यांनी स्पष्ट केले आहे. 

काँग्रेस पक्षातील अनेक आमदार नाराज

झिशान सिद्दिकी म्हणाले, काँग्रेस पक्षातील नेते सोडून जात आहेत, याचा पक्षाने विचार करायला हवा. काँग्रेस पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. कोणत्या कारणास्तव ते जात आहेत त्याच्यावर पक्षात चर्चा व्हायला हवी. आम्ही देखील अनेक कारण अनेकदा सांगितलेली आहेत. मात्र पक्षश्रेष्ठींपर्यंत ती पोहोचत नाहीत. पुढे बोलताना सिद्दिकी म्हणाले, आजच्या होणाऱ्या बैठकीला देखील मी जात आहे. आज देखील बैठकीत मी माझ्या मनात असलेले मुद्दे मांडेन. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असे झिशान सिद्दिकी यांनी स्पष्टपणे सांगितले. 

'अशोक चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेसला मोठा धक्का' 

 महाविकास आघाडीला भविष्य आहे का? याबद्दल मी बोलणार नाही. मात्र या युतीमुळे पक्षाचं नुकसान होत आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते गेल्याने काही फरक पडणार नाही असं आमचे नेते सांगतात. मात्र मोठा धक्का हा काँग्रेसला आहे. आणखी अनेक आमदार नाराज आहेत, असही झिशान यांनी नमूद केले. 

'मुंबई काँग्रेसच्या युवक कमिटी बैठका देखील माझ्याशिवाय होतात'

 हंडोरे यांना मागील वेळी अशा राजकारणामुळेच पराभव पत्करावा लागला मात्र यावेळी ते विजयी होतील. मुंबई काँग्रेसच्या युवक कमिटी बैठका देखील माझ्याशिवाय होतात, त्यामुळे हे सगळं बदलायला हवं. मी लोकांसाठी काम करतोय पुढे बघू मात्र सध्या तरी काँग्रेसमध्येच आहे, असेही झिशान सिद्दिकी यावेळी बोलताना म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

BAPS Hindu temple in Abu Dhabi : अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण; 27 एकर जागेत मंदिराची उभारणी

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुली थांबवा, सुनील तटकरेंची नितीन गडकरींकडे मागणी
मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुली थांबवा, सुनील तटकरेंची नितीन गडकरींकडे मागणी
उद्धव ठाकरेंसाठी छातीएवढ्या पाण्यातून वाट काढत आमदार लोणार सरोवरातील मंदिरात, उत्तम आरोग्यासह  पुन्हा मुख्यमंत्री होण्याची प्रार्थना
उद्धव ठाकरेंसाठी छातीएवढ्या पाण्यातून वाट काढत आमदार लोणार सरोवरातील मंदिरात, उत्तम आरोग्यासह  पुन्हा मुख्यमंत्री होण्याची प्रार्थना
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Embed widget