एक्स्प्लोर
Advertisement
बलात्कार करुन 7 वर्षीय मुलीची हत्या, 1150 पुरुषांची DNA चाचणी
पीडित मुलीच्या घरापासून अडीच किमी अंतराच्या परिसरात राहत असलेल्या 20 ते 45 वर्ष वयोगटातील 1150 पुरुषांची डीएनए चाचणी केल्यानंतर आरोपीची ओळख पटवली.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कसूर शहरात सात वर्षीय मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. आरोपी मृत झेनाब अन्सारीचा शेजारी आहे. इमरान अलीला पंजाबच्या पाकपाटन जिल्ह्यातून अटक करण्यात आली, असं पंजाब सरकारचे प्रवक्ते मलिक अहमद यांनी सांगितलं.
पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या घरापासून अडीच किमी अंतराच्या परिसरात राहत असलेल्या 20 ते 45 वर्ष वयोगटातील 1150 पुरुषांची डीएनए चाचणी केल्यानंतर आरोपीची ओळख पटवली. अहवालानुसार, आरोपीचे डीएनए 100 टक्के जुळले आहेत.
मुलीचा शेजारी संशयित इमरान अलीने (वय 23 वर्ष) तपास पथकासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी इमरान अलीचे डीएनए नमुने मुलीच्या शरीरावर मिळालेल्या नमुन्यांशी जुळत असल्याचं फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितलं. इतकंच नाही यापूर्वी लैंगिक अत्याचार करुन ज्या मुलींची हत्या झाली, त्या मुलींच्या डीएनएशी इमरानचे डीएनए जुळले आहेत. याचाच अर्थ इमरान सीरियल किलर असू शकतो, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, इमरानचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते आणि कायम तिच्या घरी जात-येत असे. अलीला दोन आठवड्यांपूर्वीच ताब्यात घेतलं होतं. पण तो दोषी असू शकत नाही, असं मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर त्याला सोडण्यात आलं होतं.
काय आहे प्रकरण?
कसूरमध्ये 5 जानेवारी रोजी पीडित मुलगी ट्यूशनवरुन आपल्या घरी परतत असताना बेपत्ता झाली होती. यावेळी तिचे आई-वडील उमरासाठी सौदी अरेबियाला गेले होते आणि ती एका नातेवाईकासोबत राहत होती.
अपहरणानंतर सीसीसीटीव्ही फुटेजमध्ये ती पीरोवाला रोडजवळ एका अज्ञातासोबत जाताना दिसली होती. यानंतर 9 जानेवारी रोजी शाहबाज खान रोडजवळ कचऱ्यात तिचा मृतदेह आढळला होता.
शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचं नमूद केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने दोषीला पकडण्यासाठी पोलिस महानिरीक्षकांना 72 तासांची मुदत दिली होती. या घटनेनंतर देशात मोठ्या प्रमाणात विरोध झाला, आंदोलनं झाली होती. पोलिसांनी या घटनेनंतर 1150 पुरुषांची डीएनए चाचणी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement