Ken Tanaka : 119 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या केन तनाका आहेत तरी कोण?
केन तनाका (Ken Tanaka) या जगातील सर्वात वृद्ध महिला आहेत.
Ken Tanaka : जपानमधील (Japan) केन तनाका (Ken Tanaka) या जगातील जीवंत असणाऱ्या सर्वात वृद्ध महिला आहेत. त्यांची जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकोर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे. 2 जानेवारी रोजी केन तनाका यांचा 119 वा वाढदिवस होता. रिपोर्टनुसार, फुकुओका शहरातील एका नर्सिंग होममध्ये राहतात.
केन तनाका यांनी सांगितले की, मी इतके वर्ष चांगल्या आहारामुळे आणि अभ्यास केल्यामुळे जिवंत आहे. केन तनाका यांना कार्बोनेटेड पेय प्यायला आणि चॉकलेट खायला आवडतात. त्या नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांसोबत हातांच्या इशाऱ्यांनी संवाद साधतात. अंकगणित त्यांचा आवडता विषय. केन तनाका यांचा 112 वा वाढदिवस देखील आम्ही साजरा करू, अशी आशा केन तनाका यांच्या कुंटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे.
1903 मध्ये झाला तनाका यांचा जन्म
केन तनाका यांचा जन्म 2 जानेवारी 1903 मध्ये झाला. त्यांच्या आईवडीलांना सात मुलं होती. त्यापैकी केन तनाक या सातव्या महिला आहेत. 19 व्या वर्षी केन तनाका यांचे लग्न हिडियो तनाका यांच्यासोबत झाले. हिडिओ आणि केन तनाक यांना पाच मुलं आहेत. केन यांना मोतीबिंदू झाला होता. तसेच त्यांनी कॅन्सर सारख्या आजारावर देखील मात केली. केन तनाक यांना बोर्ड गेम ऑथेलो खेळायला खूप आवडतो. कुटुंबातील व्यक्तींसोबत केन ऑथेलो हा बोर्ड गेम नेहमी खेळतात. त्या या खेळाच्या चॅम्पियन आहेत, असं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
Viral video : 'पैशांचा पाऊस'; इमारतीवरून उडून आले पैसे; व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha