World Red Cross Day 2022 : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीची तत्त्वे लक्षात ठेवण्यासाठी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. असहाय्य आणि जखमी सैनिक आणि नागरिकांचे संरक्षण करणे हा जागतिक रेड क्रॉस दिनाचा मुख्य उद्देश आहे. रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांची जयंतीनिमित्त त्यांनी मानवतावादी संस्थेला आणि मानवतेच्या मदतीसाठी केलेल्या अभूतपूर्व योगदानाच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. 

Continues below advertisement

रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस आणि अनेक राष्ट्रीय संस्था मिळून ही संस्था चालवतात. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड-19 च्या महामारीमध्ये रेडक्रॉस चळवळीचे महत्त्व अधिकच समर्पक झाले आहे.

जागतिक रेड क्रॉस दिनाचे महत्त्व :

Continues below advertisement

रेडक्रॉसचा उद्देश लोकांना कोणताही भेदभाव न करता मदत करणे हा आहे. महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या या संस्थेशी जगभरातील लोक जोडलेले आहेत. 

जागतिक रेडक्रॉस दिनाचा इतिहास :

स्विस उद्योगपती जीन हेन्री ड्युनंट यांनी 1859 मध्ये इटलीमधील सॉल्फेरिनोची लढाई पाहिली. ज्यामध्ये मोठ्या संख्येने सैनिक मरण पावले आणि जखमी झाले. जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी कोणत्याही सैन्याकडे क्लिनिकल सेटिंग नव्हती. ड्युनंटने स्वयंसेवकांचा एक गट तयार केला ज्यांनी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी अन्न आणि पाणी आणले. एवढेच नाही तर या गटाने त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पत्रेही लिहिली.

या घटनेनंतर तीन वर्षांनी हेन्रीने आपला अनुभव 'अ मेमरी ऑफ सॉल्फेरिनो' या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केला. पुस्तकात त्यांनी कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय समाज स्थापन करण्याची सूचना केली आहे. युद्धात जखमी झालेल्यांवर उपचार करू शकणारा समाज. जो कोणत्याही देशाच्या नागरिकत्वाच्या आधारावर नाही तर मानवतावादी आधारावर लोकांसाठी काम करतो. त्यांच्या सूचनेची अंमलबजावणी पुढच्याच वर्षी झाली.

महत्वाच्या बातम्या :