Reason Of Dry Eyes : आपल्या चेहऱ्यावरील जर सर्वात नाजूक भाग कोणता असेल तर ते म्हणजे आपले डोळे. आपले डोळे अतिशय नाजूक असतात त्यामुळे त्यांची योग्य काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपल्याला डोळ्यांशी संबंधित डोळ्यात खाज येणे, पाणी येणे, डोळा दुखणे किंवा खाजल्यावर सूज येणे अशा अनेक प्रकारचा त्रास होतो. आणि त्याकडे आपण सहजपणे दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जीवनशैलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण डोळ्यांशी संबंधित या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 


डोळे कोरडे होण्याचे कारण : 



  • पुरेशी झोप न मिळणे.

  • घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे.

  • संगणकावर जास्त वेळ घालविणे.

  • जास्त वेळ टीव्ही पाहणे आणि रात्री उशिरापर्यंत जागत राहणे.

  • पाणी कमी पिणे आणि जास्त वेळ उन्हात असणे. 

  • धुळीच्या वातावरणात अधिक काळ राहणे. 

  • अयोग्य आहार घेणे. 

  • खूप तणावाखाली असणे.

  • खूप वेळ रडणे. 

  • बराच काळ आजारी असणे.

  • काही इंग्रजी औषधांचा अतिवापर करणे. 

  • हार्मोनल समतोल न राहणे.


या लोकांना होतात अधिक समस्या :


कोरड्या डोळ्यांची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. याचे कारण हार्मोनल असंतुलन आहे. विशेषतः रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांना अशा प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागते. 


कोरडे डोळे होण्यापासून टाळण्यासाठी काही उपाय : 



  • अशा इनडोअर प्लांट्स घरात आणि कामाच्या ठिकाणी ठेवा. 

  • दररोज किमान 7 तासांची झोप घ्या. 8 तास झोप मिळत असेल तर अधिक उत्तम आहे.

  • कॉम्प्युटरवर काम करताना सतर्क राहा.

  • उन्हाळ्यात जास्त कूलिंग असलेला एसी आणि हिवाळ्यात जास्त गरम होणारा रूम हीटर वापरू नका. या दोन्हीमुळे डोळ्यांतील कोरडेपणा वाढतो.

  • कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाण्यापूर्वी सनग्लासेस घाला. स्कार्फ किंवा टोपी जरी घातली तरी चांगले आहे. 

  • उन्हाळ्यात रोज थंड दूध, लस्सी, दही, ताक प्या. ते त्वचेमध्ये अ‍ॅलिफेटिक आणतात आणि डोळ्यांचा कोरडेपणा टाळण्यास देखील मदत करतात.

  • या सर्व पद्धतींचा अवलंब करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल आणि समस्येचे कारण समजत नसेल तर नक्कीच डॉक्टरांना दाखवा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :