World Photography Day 2022 : आज साजरा केला जातोय 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व
World Photography Day 2022 : आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या क्षणाची आठवण जपून ठेवणारा दिन म्हणजे जागतिक फोटोग्राफी दिन.
World Photography Day 2022 : आपल्या आयुष्यात अनेक चांगले क्षण येतात. या चांगल्या क्षणाची आठवण कायम स्मरणात राहावी असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं. आणि म्हणून आपण हे क्षण कॅमेऱ्यात (Camera) टिपतो आणि कायम जपून ठेवतो. आयुष्यातील याच चांगल्या क्षणाची आठवण जपून ठेवणारा दिन म्हणजे जागतिक फोटोग्राफी दिन (World Photography Day 2022). याच दिनानिमित्त आपण फोटोग्राफीची पार्श्वभूमी जाणून घेणार घेऊयात.
जागतिक फोटोग्राफी दिनाचा इतिहास (World Photography Day History) :
माहितीनुसार जागतिक फोटोग्राफी दिनाची सुरुवात तशी 2010 पासून झाली मात्र याचा इतिहास खूप जुना आहे. फ्रान्समधील जोसेफ नीसफोर निपसे (joseph Nicephore Niepce) आणि लुईस डॅगुएरे (Louis Daguerre) नावाच्या दोन व्यक्तिंनी ‘डॅगुएरोटाइप’ चा शोध लावून प्रथमच छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली. फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सने 9 जानेवारी 1837 रोजी अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. ही घोषणा झाल्यानंतर 10 दिवसांनी फ्रेंच सरकारने आविष्काराचे पेटंट खरेदी केले आणि ते जगाला भेट म्हणून दिले कॉपीराइट न ठेवता दिले.19 ऑगस्ट 1939 रोजी सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. म्हणून हा दिवस ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ म्हणजेच जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो.
1839 मध्ये विल्यम हेन्री (William Henry) फॉक्स टालाबॉटने छायाचित्र काढण्याची प्रक्रिया सुलभ केली. टालाबॉट यांनी कागदावर आधारित मीठ प्रिंट वापरून एक अधिक अष्टपैलू छायाचित्रण प्रक्रिया शोध लावला. तसेच अमेरिकेचे फोटो प्रेमी रॉबर्ट कॉर्नेलियस (Robert Cornelius) यांना जगातील पहिले सेल्फी क्लिक करणारे व्यक्ती मानले जातात. त्यांनी 1839 मध्ये ही सेल्फी काढली होती.
जागतिक फोटोग्राफी दिनाचे महत्त्व (World Photography Day Importance) :
19 ऑगस्ट रोजी हा दिवस हा साजरा केला जातो यामागची काही कारणं आहेत. हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं, सोबतच त्यांनी काढलेल्या खास फोटोंना जगभरातील फोटो प्रेमींच्या समक्ष प्रस्तुत करणं.
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Shravan 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?