Important days in 25th April : एप्रिल महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 25 एप्रिलचे दिनविशेष.


1874 : रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म.


गुग्लियेमो मार्कोनी हे इटलीचे संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ संशोधक होते. गुग्लियेमो मार्कोनी यांनी रेडिओच्या शोधातून संवादात क्रांती घडवून आणली. बिनतारी तारयंत्र विद्येच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल मार्कोनी यांना कार्ल फेडिंनांट ब्राउन यांच्या समवेत 1909 साली नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. इतर शास्त्रज्ञांनी विशद केलेल्या विद्युत् चुंबकत्वासंबंधीच्या तत्त्वांचा उपयोग अवकाशातून संदेश प्रेषण करण्यासाठी मार्कोनी यांनी केला, तसेच एकाच वेळी अनेक ग्राही स्थानकांशी बिनतारी विद्युत् संदेशवहन साधण्याची व्यावहारिक शक्यता उपयोगातही आणली.


1905 : दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार मिळाला.


1953 : केंब्रिज विद्यापीठातील जेम्स डी. वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी डीएनएची रचना स्पष्ट करून जीवशास्त्राच्या एका मूलभूत कोड्याचे उत्तर शोधून काढले. या दोन्ही शास्त्रज्ञांना त्यांच्या शोधासाठी 1962 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. 


1975 : सोव्हिएत युनियनने भूमिगत अणुचाचणी केली.


1979 : सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.


सुएझ कालव्याचे अरबी नाव कनात ॲस-सुवेस. ईजिप्तच्या सुएझ संयोगभूमीतून खोदलेला एक कालवामार्ग. उत्तर-दक्षिण गेलेल्या 162 किमी. लांबीच्या या कालव्यामुळे उत्तरेकडील भूमध्य समुद्र आणि दक्षिणेकडील सुएझ आखात-तांबडा समुद्र एकमेकांना जोडले गेले आहेत. कालवा 1967 – 75 दरम्यान वाहतुकीस पूर्णपणे बंद होता. ईजिप्त आणि इझ्राएल या दोन देशांदरम्यानच्या वाटाघाटीस अमेरिकेच्या मध्यस्थीने प्रारंभ झाल्यावर कालव्याच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीस सुरुवात झाली. ईजिप्त-इझ्राएलमध्ये कँप डेव्हिड (अमेरिका) येथे अन्वर सादत आणि मेनाशेम बेगीन या दोन राज्यकर्त्यांत दोन करार होऊन 25 एप्रिल 1979 रोजी शांततेचा तह झाला आणि प्रथम इझ्राएलच्या जहाजांना कालव्यातून सोडण्यात येऊन त्यांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली.


1982 : दिल्लीत रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात.


दूरदर्शन ही दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रेक्षेपित करणारी भारत सरकारची एक संस्था आहे. माहिती आणि नभोवाणी खात्यापासून स्वतंत्ररीत्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम संयोजित करण्यासाठी दूरदर्शन ही संस्था 1 एप्रिल 1976 रोजी स्थापन करण्यात आली. 25 एप्रिल 1982 रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात झाली. या दिवशी पहिल्यांदाच दूरदर्शन रंगतदार झाले आणि त्यानंतर देशात रंगीत टीव्हीची क्रेझ वाढत गेली. 


2008 : जागतिक मलेरिया दिन.


हिवताप (Malaria) या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो. हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. त्यापूर्वी 25 एप्रिल हा दिवस केवळ ‘आफ्रिकन हिवताप दिवस’ म्हणून ओळखला जात असे. 


2015 : 7.8 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात 9100 जण मारले गेले.


नेपाळमध्ये एका भीषण भूकंपाने मोठा विध्वंस केला. राजधानी काठमांडूजवळ झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नितांतसुंदर नेपाळमध्ये 25 एप्रिलला आलेल्या भूकंपात आठ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या भूकंपानं बेघर झालेल्या आणि भेदरलेल्या हजारो नागरिकांनी उघड्यावरच मुक्काम थाटला. 7.9 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपानं उद्ध्वस्त झालेलं नेपाळ मोठ्या भूकंपानं हादरलं. या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी होती. चीन-नेपाळ सीमेवरील कोडारी गावाजवळ, जमिनीखाली 19 किमीवर भूकंपाचं केंद्र असून साधारण 30 सेकंद हे धक्के जाणवले. या भूकंपामुळे दिल्लीसह उत्तर आणि पूर्व भारतातही काही सेकंद जमीन हलल्यानं खळबळ उडाली.


महत्वाच्या बातम्या :