Health Care :  अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहाने करतात. काही जणांना दिवसातून 4 ते 5 वेळा चहा पिण्याची सवय असते. काही लोक चहासोबतच पोळी, बिस्किट किंवा टोस्ट, खारी खातात. पण काही पदार्थ चहासोबत खाल्यानं तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांचे सेवन चहासोबत करू नये...


चहासोबत अंड, सॅलड किंवा कांदा या गोष्टीचे सेवन करू नका 
अनेकांना नाश्ता करताना चहा प्यायची सवय असते. लोक ब्रेक-फास्ट करताना अंड, सॅलड किंवा कांदा टाकलेले पदार्थ खातात.पण या गोष्टींसोबत चहा पिला तर तुम्हाला आजार होऊ शकतात. या पदार्थांमध्ये असणारी तत्वे आणि चहामधील चहा पावडर यांची रिअॅक्शन होऊ शकते. यामुळे शारीरावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला पोटदुखीची समस्या देखील जाणू शकते. 


चहा आणि बेसनाचापासून तयार केलेले पदार्थ 
चहासोबत कधीही बेसनापासून तयार केलेल पदार्थ खाऊ नयेत. चहासोबत बेसनाचा वापर करून तयार केलेले पदार्थ खाल्ले तर पचन क्रिया बिघडते. कारण बेसन हे पचायला जड असते. 


चहा पित असताना पाणी पिऊ नका
अनेकांनी चहा पिल्यानंतर किंवा आधी पाणी प्यायची सवय असते. पण चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्यानं तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात. चहा प्यायल्यानंतर पणी प्यायल्यानं पचन क्रिया खराब होईल. तसेच अॅसिडीटीची समस्या तुम्हाला जाणवेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.