World Heritage Day 2022 : जगातील निवडक वारसा स्थळांचा सुवर्ण इतिहास आणि बांधकाम जतन करण्यासाठी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. लोकांना समृद्ध वारशाची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून लोकांना त्यांची संस्कृती आणि परंपरा जवळून समजून घेता येईल. दरवर्षी ICOMOS जागतिक वारसा दिनासाठी एक थीम सेट करते.


भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात अशी 40 स्थाने आहेत. यामध्ये 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त अशी 55 स्थाने आहेत. 


जागतिक वारसा दिनाचा उद्देश


18 एप्रिल रोजी साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक वारसा दिनाचा उद्देश जगभरातील मानवी इतिहासाशी संबंधित ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांचे जतन करणे हा आहे, ज्यासाठी लोकांना जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे.





 


जागतिक वारसा दिनाचे महत्त्व


जागतिक वारसा दिनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी पर्यटन हे खूप मोठे माध्यम बनले आहे. विविध देशांत वसलेली ही वारसा स्थळे निसर्गासोबत माणसाच्या सर्जनशीलता आणि कलात्मकतेबद्दल बोलतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असली पाहिजे. 


भारतातील जागतिक वारशांची यादी खालीलप्रमाणे : 


1. अजिंठा लेणी - अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या 29 बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून 100 ते 110कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून 15-30 मीटर (40-100 फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत.


2. वेरूळ लेणी - वेरूळची लेणी (Ellora Caves) ही औरंगाबाद शहरापासून 30 कि. मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.


3. आग्‍ऱ्याचा किल्ला - हा भुईकोट किल्ला भारताच्या आग्रा शहरात आहे. यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध ताजमहाल येथून अडीच किमी अंतरावर आहे या किल्ल्याला काही इतिहासकार चार भिंतीनी घेरलेली प्रासाद महाल नगरी म्हणतात.


4. ताजमहाल - ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुनानदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची आर्किटेक्चरल शैली पर्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी संमिश्रता आहे. 1983 मध्ये, ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ बनले. यासह, हे जागतिक वारसामध्ये प्राप्त झालेल्या सर्वोत्कृष्ट मानवी कार्यांपैकी एक म्हणून वर्णन केले गेले आहे. 


याशिवाय या यादीत कोणार्क सूर्यमंदिर, महाबलीपुरम येथील स्मारके, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, गोव्याचे चर्च आदी वास्तूंचाही समावेश आहे. 


महत्वाच्या बातम्या :