Important days in 14th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 14 एप्रिलचे दिनविशेष. 


1675 : ताराबाई 1700 ते 1708 पर्यंत भारताच्या मराठा साम्राज्याच्या रीजेंट होत्या.


1699 : खालसा: शीख धर्माला नानकशाही दिनदर्शिकेनुसार उत्तर भारतात गुरू गोविंद सिंग यांनी खालसा - योद्धा-संतांचा बंधुत्व - म्हणून औपचारिक रूप दिले.


1891 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. 


भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' म्हणतात. 


1912 : आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. 


1912 मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यू यॉर्क शहराकडे सफरीला निघाले. चार दिवसांनी 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक जहाज बुडाले. यामध्ये एकूण 2,227 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी 1,517 लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो.


1919- शमशाद बेगम यांचा जन्म.


शमशाद बेगम या भारतीय गायिका होत्या. त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक होत्या. त्यांनी 577 पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत. शमशाद बेगम यांचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.


1927 : विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म.


दत्ताराम मारुती मिरासदार हे मराठीतले साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले.


बंगाली नववर्ष 14 एप्रिल रोजी बांगलादेशमध्ये राष्ट्रीय सुट्टी म्हणून पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि उत्तर ओडिशा आणि आसामच्या काही भागांमध्ये साजरे केले जाते. तामिळ नवीन वर्ष किंवा पुथंडू हा तमिळ कॅलेंडरवरील वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पारंपारिकपणे उत्सव म्हणून साजरा केला जातो.


2006- दिल्लीतील जामा मशिदीत अस्रच्या प्रार्थनेदरम्यान क्रूड बॉम्बने घडवून आणलेल्या दुहेरी स्फोटात 13 लोक जखमी झाले.


महत्वाच्या बातम्या :