Corona in China : चीनमध्ये सध्या कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोविड-19 च्या नवीन लाटेत, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रथमच शांघायमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात गेल्यानंतर तिघांची प्रकृती चिंताजनक झाली आणि त्यांना बरे करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. ज्यानंतर तिघांचाही मृत्यू झाला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, रविवारी कोविड-19 ची लागण झालेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या उद्रेकादरम्यान प्रथमच चीनमधील शांघाय येथे कोरोनाव्हायरस रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 17 एप्रिल रोजी शांघायमध्ये कोरोनाचे 19,831 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्याच वेळी, याआधी, शनिवारी म्हणजेच 16 एप्रिल रोजी 21,582 प्रकरणे नोंदवण्यात आली होती.


शांघायमध्ये 25 दशलक्ष लोकांना त्यांच्या घरात कैद राहण्यास भाग 
चीनमध्ये झिरो कोविड धोरण लागू आहे. शांघायसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनच्या परिस्थिती आहे. एकट्या शांघायमध्ये सुमारे 25 दशलक्ष लोकांना त्यांच्या घरात कैद राहण्यास भाग पाडले आहे. नवीन लाटेनंतर प्रथमच शांघायमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यूची नोंद झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे. असे सांगितले जात आहे की वुहानमध्ये 2019 मध्ये कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर शांघाय हे आतापर्यंतचे सर्वाधिक संक्रमित शहर बनले आहे.


दोन चरणात लॉकडाउन


शांघायमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. 28 मार्च रोजी, चीनच्या सर्वात मोठ्या शहराने ओमिक्रॉन प्रकारासह संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दोन चरणात लॉकडाउन सुरू केले. शांघायसह अनेक शहरांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढल्यानंतर आणखी निर्बंध लादले जात आहेत. चीनच्या वायव्य शहर झियानमध्ये या महिन्यापासून कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता, स्थानिक प्रशासनाने लोकांना विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना दिल्या आहेत. 


भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 542 इतकी
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 542 इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 1985 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 965 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 10 हजार 773 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :