Important days in 18th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 18 एप्रिलचे दिनविशेष.
1853 : मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
एप्रिल 18, इ.स. 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस, आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटर (21 मैल) धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते, आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली.
1858 : स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म.
सन 1858 साली भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारत रत्न सन्मानित विधवा महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे सुप्रसिद्ध भारतीय समाजसुधारक महर्षि कर्वे उर्फ धोंडो केशव कर्वे यांचा जन्मदिन.
1859 रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर ऊर्फ तात्या टोपे यांचे निधन.
रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर ऊर्फ तात्या टोपे यांची पुण्यतिथी. तात्या टोपे हे 1857च्या उठावामधील सेनानी होते. 1857 मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर आणि कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपे होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला.
1916 : हिंदी आणि मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म.
ललिता पवार या एक हिंदी आणि मराठी चित्रपटातील अभिनेत्री होत्या. ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. दूरदर्शनवरील रामायण या मालिकेमध्ये त्यांनी मंथरेची भूमिका केली होती.
1955 : सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निधन.
अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते. सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. आइन्स्टाईन हे सापेक्षतेचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच क्वांटम मेकॅनिक्सच्या सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सापेक्षता आणि क्वांटम मेकॅनिक्स हे आधुनिक भौतिकशास्त्राचे दोन आधारस्तंभ आहेत. त्यांचे सूत्र E = mc2, जे सापेक्षता सिद्धांतातून तयार झाले, हे "जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण" म्हणून ओळखले जाते.[३] त्यांच्या कार्याचा प्रभाव विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावर देखील पडला.
1962 : हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा जन्म.
पूनम ढिल्लन या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. त्या मूळच्या बिहारच्या आहेत. त्यांनी थिएटर आणि टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले आहे. 1978 मध्ये त्यांनी फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावला होता. 1979 मध्ये नूरी, रेड रोज, दर्द, निशान, जमाना, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या.
जागतिक वारसा दिन (World Heritage Day)
लिखित स्वरूपाच्या इतिहासाबरोबर वास्तुरुपी राष्ट्रवैभवाचे योग्य संवर्धन करणे हे सरकार बरोबर सुजाण नागरिकांचाही कर्तव्य आहे याची समाज मनाला जाण देण्यासाठी युनेस्को तर्फे 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या :