World Economic Forum Report : तंत्रज्ञानाच्या वापरामुळे किंवा कामाच्या ठिकाणी मशिनच्या वापरामुळे 2025 पर्यंत जगातल्या दहा पैकी सहा लोकांना आपला रोजगार गमवावा लागणार असल्यांचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या अहवालात सांगितलं आहे. 


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने कन्सल्टिंग कंपनी असलेल्या PwC या कंपनीसोबत मिळून हा अहवाल तयार केला आहे. यासाठी जगभरातल्या 19 देशातल्या 32,000 कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षात आपल्याला आता ज्या ठिकाणी काम करतोय त्या रोजगाराला मुकावं लागणार आहे असं 40 टक्के कामगारांना वाटतंय. तर 56 टक्के लोकांना असं वाटतंय की त्यांच्या पैकी काहीच लोक दीर्घ काळासाठी त्यांचा रोजगार टिकवून ठेवू शकतात.


या अहवालातून असंही स्पष्ट झालं आहे की, जगभरातल्या 60 टक्के कर्मचाऱ्यांना असं वाटतंय की सरकारने त्यांचे रोजगार टिकून राहण्यासाठी काही प्रयत्न करणे गरजेचं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात 40 टक्के कर्मचाऱ्यांनी आपले डिजिटल कौशल्य वाढवण्यावर भर दिला आहे तर 77 टक्के कर्मचारी हे नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी तयार आहेत. 80 टक्के कर्मचाऱ्यांना ते अत्याधुनिक डिजिटल कौशल्य शिकू शकतील याचा आत्मविश्वास आहे. 


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गेल्या वेळच्या अहवालानुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इन्टेलिजन्समुळे जगभरातील 8.5 कोटी रोजगार धोक्यात आले आहेत. पण त्याच वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इन्टेलिजन्समुळे 9.7 कोटी नवे रोजगार निर्माण होणार असल्याचंही त्या अहवालात सांगण्यात आलं होतं. 


महत्वाच्या बातम्या :