Sheikh Hamdan bin Rashid : दुबईचे दुसऱ्या क्रमांकाचे शासक असलेल्या शेख हमदान बिन राशिद यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. ते संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्रीदेखील होते. दुबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका आर्थिक केंद्रामध्ये विकसित करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. 


गेल्या काही दिवसांपासून शेख हमदान बिन राशिद यांची तब्बेत ठिक नसल्याचं सांगण्यात येतंय. नुकतंच ते एका सर्जरीसाठी विदेशात गेले होते. त्याचवेळी त्यांचे भाऊ आणि दुबईचे शासक शेख महम्मद यांनी त्यांच्या आरोग्यासाठी एका ट्वीटच्या माध्यमातून दुवा मागितली होती. 


शेख हमदान बिन राशिद यांचा जन्म 25 डिसेंबर 1949 साली झाला होता. ते सध्या युएईचे अर्थमंत्री होते. अर्थमंत्री म्हणून काम करताना त्यांनी युएईमध्ये जास्तीत जास्त विदेशी गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न केले. देशातील तेल संपत्तीचे विकासासाठी कुशालीने प्रयत्न केले. त्यांनी युएईकडून आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि ओपेक या पेट्रोलियम देशांच्या गटामध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलं. 


त्यांच्या मृत्यूची माहिती देताना प्रशासनाने नेमक्या कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला याची  माहिती दिली नाही. कोरोनाच्या कारणामुळे अंत्यविधीमध्ये लोकांना सामिल होता येणार नसून हा विधी कुटुंबातील काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :