लंडन: ब्रिटनमध्ये  Oxford-AstraZeneca ची कोरोनाची लस घेतल्यानंतर सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलंय. ही लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर ने दिली आहे. 


 




या आधी युरोपातील काही देशांकडून  AstraZeneca च्या कोरोना लसीची तक्रार येत होती. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी जगभरातील देशांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) लस वापरणे सुरू ठेवण्याची शिफारस केली. लसीबाबत अनेक देशांनी नागरिकांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर  लसीच्या वापरावर स्थगिती आणली होती. त्यानंतर लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष देत आहोत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं.  


WHO, युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि AstraZeneca यांनी स्वतः ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा-पुन्हा सांगितले होतं. या लसीच्या वापरामुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. WHO ने देखील AstraZeneca क्लीन चिट देत सांगितलं होतं की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेली एकही केस आढळली नाही. फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस वापरण्यास मनाई केली. या देशांनी असं म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे.


काही युरोपियन देशांनी या आधीच AstraZeneca आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे विकसित केलेल्या कोविड 19 लसीच्या वापरावर काही प्रमाणात बंदी घातली होती. लसीकरणानंतर काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी होऊन झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर या देशांमध्ये लसीचा वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लस घेतल्यानंतर डेन्मार्कमधील एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झाला आहे.


ब्रिटनमध्ये मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने एका निवेदनात म्हटले होतं की, अ‍ॅस्ट्राजेनेका कोविड -19' लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत याची अद्याप खात्री झालेली नाही. म्हणून लोकांनी अद्याप कोविड -19 लस घेणे सुरू ठेवले पाहिजे.


आता ही लस घेतल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याचं स्वत: ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटरने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये या लसीवर आता बंदी येणार का ते पाहणे आवश्यक आहे.


महत्वाच्या बातम्या :