World Book Day 2022 : वाचनानं समृद्ध होतं माणसाचं जीवन; जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास काय?
World Book Day 2022 : संपूर्ण जगभरात 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन (World Book Day) आणि कॉपीराइट दिन (Copyright Day) साजरा केला जातो.
![World Book Day 2022 : वाचनानं समृद्ध होतं माणसाचं जीवन; जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास काय? World Book Day 2022 know the history and importance of the day World Book Day 2022 : वाचनानं समृद्ध होतं माणसाचं जीवन; जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/23/d1c691d224829538c086b836c6b1f98f_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
World Book Day 2022 : संपूर्ण जगभरात 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन (World Book Day) आणि कॉपीराइट दिन (Copyright Day) साजरा केला जातो. या दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. सध्या सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटचा अधिकाधिक वापर करणारा तरूण वर्ग जरी असला तरी एखाद्या शांत ठिकाणी, एकांतात, पुस्तकांना आपला मित्र मानणाऱ्या तरूणाईची संख्या देखील कमी नाही. या दिवशी अनेकजण व्हॉट्सअॅपवर आपल्या आवडत्या पुस्तकाचा फोटो सोशल मीडियावर स्टेट्स म्हणून टाकताना दिसतात. तर काही जण एकमेकांना पुस्तक भेट म्हणून देतात. परंतु, अनेकांना हा दिवस नेमका का साजरा केला जातो? या दिनाचं महत्त्व काय हे माहित नसतं. चला तर मग जाणून घेऊयात जागतिक पुस्तक दिनाविषयी...
23 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन?
23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे या दिवशी अनेक नामवंत लेखकांचे निधन झाले. विल्यम शेक्सपियर, मिगुएल डी सर्व्हंटिस, इंका गार्सिलोसो यांचे निधन 23 एप्रिल रोजी झाले. हा दिवस पहिल्यांदा 23 एप्रिल 1923 रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. प्रत्येक वर्षी, UNESCO आणि आंतरराष्ट्रीय संस्था पुस्तक उद्योगातील तीन प्रमुख क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामध्ये प्रकाशक, पुस्तक विक्रेते आणि ग्रंथालये यांचा समावेश होतो.
कसा साजरा केला जातो हा दिवस ?
प्रत्येक वर्षी जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी पुस्तकांचं प्रदर्शन भरविण्यात येतं, तर काही ठिकाणी वाचनालयात एक दिवस मोफत पुस्तके वाचायला दिली जातात. काही ठिकाणी तर विनामूल्य पुस्तकांची विक्री केली जाते. तसेच आपल्या मित्र- मैत्रिणींकडून आपल्या आवडत्या पुस्तकांची देवाण-घेवाण देखील केली जाते.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)