एक्स्प्लोर
फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'
लंडनमधील एका महिलेनं चोराकडून स्वत:चीच सायकल चोरी करुन परत मिळवली आहे. विशेष म्हणजे, यात तिला फेसबुकवरील जाहिरातीची मदत मिळाली.
लंडन : काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी त्रिकूटाचा रिलीज झालेला फिर हेराफेरी हा सिनेमा अतिशय लोकप्रिय झाला. या सिनेमात 'चोर के घर से चोरी' असा संवाद होता. पण ब्रिटनमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. लंडनमधील एका महिलेनं चोराकडून स्वत:चीच सायकल चोरी करुन परत मिळवली आहे. विशेष म्हणजे, यात तिला फेसबुकवरील जाहिरातीची मदत मिळाली.
टेलिग्राफच्या वृत्तानुसार, लंडनच्या ब्रिस्टलमधील रहिवासी असलेल्या जेनी मार्टन-हम्फ्रेजची सायकल काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. यानंतर तिने आपल्या सायकलीचा फोटो फेसबुकवर पोस्ट करुन मदतीचं आवाहन केलं होतं.
पण फेसबुकवर याच सायकलशी साधर्म्य असणाऱ्या अणखी एका सायकलची जाहिरात पोस्ट केली होती. फेसबुकवरील जाहिरात जेनीच्या मित्रानं पाहिलं, आणि जेनीशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.
यानंतर जेनी आणि तिच्या मित्राने सायकल खरेदी करण्याच्या बहाण्याने जाहिरातदाराशी संपर्क साधला. शिवाय, चोरीला गेलेली आपली सायकल परत मिळवण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे मदत मागितली. पण पोलिसांनी तिला नकार दिला.
यानंतर तिने जाहिरातदाराची भेट घेऊन, सायकलची टेस्ट ड्राईव्ह मागितली. जेनी ही ग्राहक असल्याचे समजून त्यानेही तत्काळ तिला टेस्ट ड्राईव्हची परवानगी दिली. यानंतर तिने टेस्ट ड्राईव्हसाठी सायकलवर स्वार होऊन, धुम ठोकली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
शिक्षण
व्यापार-उद्योग
Advertisement