Russia Ukraine War : ...म्हणून भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला जातात; सध्या 'या' समस्यांचा करतायत सामना
Russia Ukraine Crisis : शिक्षण घेण्यासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत.
Russia Ukraine Crisis : रशियानं शुक्रवारी (25 फेब्रुवारी) युक्रेनची राजधानी कीववर हल्ला केला. या हल्ल्यामुळे अनेक लोक युक्रेनमधून दुसऱ्या देशात जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थांनं दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील इंधन, पैसे आणि वैद्यकीय पुरवठा कमी होत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी सध्या तिथे अडकले आहेत. यामधील अनेक विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
भारतामधील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला का जातात?
Study In Ukraine या वेब साइटच्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात कारण तेथे वैद्यकीय शिक्षण हे स्वस्त आहे. तसेचयुक्रेनमध्ये मिळवलेली पदवी ही जागतिक आरोग्य संघटना (WHO), युरोपियन कौन्सिल आणि इतर जागतिक संस्थांसह जगभरात मान्यताप्राप्त आहे. युक्रेनमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युरोपमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य आणि स्थायिक होण्याची शक्यता असते. वैद्यकीय शिक्षणाव्यतिरिक्त, काही भारतीय विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी देखील युक्रेनमध्ये येतात.
विद्यार्थी सध्या 'या' समस्यांचा करतायत सामना
युक्रेनमध्ये अडकलेले अनेक भरतीय विद्यार्थी हे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडत आहेत. सुमिंदर नावाच्या विद्यार्थ्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तो तळघरात लपून बसेसला आहे आणि तिला सतत बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. तर दुसरा विद्यार्थी म्हणाला, 'आम्ही सीमेच्या अगदी जवळ आहोत. आम्हाला स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. आम्ही बाहेरही जात नाही'
युक्रेनच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, युक्रेनमध्ये 20,000 हून अधिक भारतीय नागरिक आहेत आणि त्यापैकी 18,000 विद्यार्थी आहेत. युक्रेन- रशिया युद्ध सुरू झाल्यापासून, सुमारे 4,000 भारतीय हे युक्रेनमधून भारतात परत आले आहेत, परंतु 16,000 लोक अजूनही तिथे अडकले आहेत.
संबंधित बातम्या:
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
- Russia-Ukraine: थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर इम्रान खाननी रशिया दौरा रद्द करावा: शशी थरूर
- Russia-Ukraine Crisis: रशियाचं वर्तन हे 'नाझी जर्मनी'सारखं; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोदिमर झेलन्स्की यांचा आरोप