Bloomberg Index : वॉरन बफेट (Warren Buffett) यांनी संपत्तीच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे. तर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांच्या एकूण संपत्तीत गुरुवारी 25.8 अब्ज डॉलरची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या (Bloomberg Billionaires Index) इतिहासातील एका दिवसातील ही चौथी मोठी घसरण आहे. वॉरन बफे पुन्हा एकदा मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत बनले आहेत. झुकरबर्गच्या संपत्तीत जवळपास 12 टक्क्यांनी घट झाली आहे.
वॉरन बफेट यांनी संपत्तीत मार्क झुकरबर्गला टाकलं मागे
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, वॉरेन बफेट संपत्तीच्या बाबतीत मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील (Silicon Valley) सर्वात श्रीमंत लोकांकडून जवळपास 50 अब्ज डॉलरची संपत्ती नष्ट करणार्या टेक स्टॉकमध्ये (Tech Stocks) या आठवड्यात झालेल्या तीव्र घसरणाचाही हा परिणाम आहे.
वॉरेन बफेट आता झुकरबर्ग यांच्यापेक्षा एक अब्ज डॉलरने पुढे
मेटा प्लॅटफॉर्म्सचे (Meta Platforms Inc) सह-संस्थापक झुकरबर्ग यांच्या संपत्तीत 2022 मध्ये 12 टक्क्यांनी म्हणजे सुमारे 15 अब्ज डॉलरची घट झाली आहे. वॉरेन बफेट यांची एकूण संपत्ती या वर्षी 2.4 अब्ज डॉलरवरून 111.3 अब्ज डॉलर झाली आहे. वॉरेन बफेट आता झुकरबर्ग यांच्यापेक्षा एक अब्ज डॉलरने पुढे आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे दिसताच स्वतःला असं करा होमक्वारंटाईन, 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
- भारत बायोटेकच्या Intranasal Booster Dose च्या चाचणीला DCGIची मंजुरी
- Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट शिगेला? काय म्हणालं केंद्रीय आरोग्य मंत्रालय : वाचा सविस्तर
- महाराष्ट्रात मास्कमुक्ती शक्य आहे की नाही?, टास्क फोर्सने एका वाक्यात सांगितलं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha