Omicron Variant : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता डॉक्टर रुग्णांना सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी आणि ताप ही ओमायक्रॉनची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, आपण स्वतःला होम-क्वॉरंटाईन करावे. यासंबंधित सविस्तर जाणून घ्या. तज्ज्ञांचे मते, कोरोनाची लक्षणे दिसल्यावर प्रथम स्वत:ला तुमच्या कुटुंबातील सदस्यांपासून दूर ठेवा. यानंतर, ताण न घेता फक्त आराम करा.


अशा परिस्थितीत तुमच्या घरातील सदस्यांना मास्क घालण्याचा सल्ला द्या. तसेच घरात स्वच्छता ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात डिजिटल थर्मामीटर ठेवा. घरातील प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासत राहा. तापमान 99.5 पेक्षा जास्त असल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय, एक ऑक्सिमीटर ठेवा आणि दर 6 तासांनी तुमची ऑक्सिजन पातळी आणि नाडी तपासत राहा. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला गंभीर स्थितीत जाण्यापासून वाचवू शकता. तसेच, ज्या खोलीत तुम्ही वेगळे आहात त्या खोलीत योग्य क्रॉस वेंटिलेशन असणे फार महत्वाचे आहे.


याशिवाय, तुमचे वय 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, लस नक्कीच घ्या. लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुम्हाला संसर्ग झाल्यास व्हायरसशी लढण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस तुम्हाला प्रचंड प्रतिकारशक्ती देईल. या सगळ्यानंतर तुमची प्रकृती अधिक गंभीर असेल तर ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हा. कोरोना टाळण्यासाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासह तुम्ही स्वतःची काळजी घ्याल. तसेच तुम्ही तुमच्या प्रियजनांचे प्राण वाचवू शकता


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha