लंडन: एखाद्या कंपनीसाठी प्रामाणिकपणे काम करणारा कर्मचारी हीच सर्वात मोठी संपत्ती असते. ब्रिटनमध्ये चप्पल बनवणाऱ्या कंपनीचा असाच एक कर्मचारी आहे ज्याने गेल्या 70 वर्षांपासून सलगपणे कंपनीसाठी काम केलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्मचाऱ्याने 70 वर्षात एकही रजा घेतली नाही हे विशेष आहे. ब्रायन कॉर्ले (Brian Chorley) असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. 


क्लार्क्स शूज फॅक्टरीमध्ये (Clarks shoes factory) ब्रायन कॉर्ले याने 1953 साली नोकरीला सुरुवात केली. त्यावेळी ब्रायन यांचे वय केवळ 15 वर्षे होतं. शाळेला उन्हाळी सुट्टी पडल्यानंतर ब्रायन यांनी ही नोकरी सुरू केली.  ब्रायन यांना प्रामाणिकपणे या कंपनीसाठी काम केलं. आता ते 83 वर्षाचे आहेत आणि अजूनही याच कंपनीत काम करत आहेत हे विशेष. 


कंपनी बदलली पण कर्मचारी नाही
ब्रायन काम करत असलेली मुळची कंपनी ही 1980 साली बंद झाली. त्यावेळी ब्रायन यांचं वय हे 50 वर्षे इतकं होतं. या कंपनीने आपले शॉपिंग आऊटलेट सुरू केलं आणि ब्रायन यांनी पुन्हा नोकरी सुरू केली. आपल्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत आपण कंपनीच्या ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचं काम केलं आणि याचा आपल्याला अभिमान आणि समाधान असल्याचं  मत ब्रायन कॉर्ले यांनी सांगितलं. 


एवढी वर्षे काम करुनही ब्रायन कॉर्ले हे निवृत्तीचा विचार करत नाहीत. आपल्याला वयाच्या 93 व्या वर्षापर्यंत काम करायचं आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. डेव्हिड अटेनबॉरो हे आपले आदर्श असल्याचं ब्रायन कॉर्ले यांनी सांगितलं. डेव्हिड अटेनबॉरो यांनी वयाच्या 95 व्या वर्षांपर्यंत काम केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: