Vladimir Putin : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापसून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या युद्धात दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिणाम झाला आहे. रशियाकडून युक्रेनला सतत शरण येण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, युक्रेनही माघार घेण्याच्या तयारीत नाही. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे काही दिवसांच्या सुट्टीवर चालले आहेत. पुतिन यांची कॅन्सरवरील  एक सर्जरी होणार आहे. परंतु,आता पुतिन यांच्या या सर्जरीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी कोण सांभाळणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. 


पुतिन त्यांच्या अनुपस्थितीत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि एफएसबी या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख निकोलाई पेत्रुशेव यांच्याकडे सोपवली जाईल अशी शक्यता  काही वृत्तसंस्थांनी वर्तवली आहे. पुतिन यांच्या जवळच्या लोकांमध्ये पेत्रुशेव यांची गणना होते. यादरम्यान युक्रेन युद्धाची जबाबदारी देखील पेत्रुशेव यांच्याकडेच राहील.


रशियन टेलिग्राम वाहिनीने पुतिन यांच्या ऑपरेशनची माहिती ठोस असल्याचा दावा केला आहे. पुतिन यांना 18 महिन्यांपूर्वी पोटाचा कर्करोग आणि पार्किन्सन्स आजार झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. परंतु, पुतिन यांनी ही  शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती.  


निकोलाई पेत्रुशेव्ह पुतिन यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनीच पुतीन यांना खात्री दिली होती की युक्रेन निओ-नाझींनी भरलेला आहे आणि तेच सतत रशियाविरुद्ध कट रचत होते. यानंतरच पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला.


महत्वाच्या बातम्या