Pakistan Economy Crisis : गेल्या वर्षीपासून पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याचं आर्थिक संकटामुळे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची सत्ताही गेली. इम्रान खान यांच्यानंतर आता शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आहेत. इम्रान खान यांची सत्ता गेल्याचा पाकिस्तानला फायदा झाल्याचं दिसत आहे. नवीन पंतप्रधान शाहबाज शरीफ सौदी सौदी अरेबियाकडून 8 अब्ज डॉलरचं कर्ज मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. यामुळे आता पाकिस्तानला आर्थिक संकटामून काहीसा दिलासा मिळणार आहे.


दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यकाळात सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील संबध बिघडले होते. हे संबंध इतके वाईट झाले होते की, सौदी अरेबियाने पाकिस्तानला आधी दिलेले 4.2 अब्ज डॉलर परत करण्यास सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करण्याची मोहीम सुरू झाली आणि त्यात विरोधकांना यश आलं. इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले. 


शाहबाज शराफी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सौदी अरेबियाकडे मदत मागितली. त्यानंतर सौदी अरेबियानेही कर्ज देण्याचं मान्य केलं आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानला 8 अब्ज डॉलरचं नवीन कर्ज देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये तेल उधार घेणे आणि जुने कर्ज फेडणे याचादेखील समावेश आहे. अहवालानुसार, या कर्ज पॅकेजच्या तांत्रिक मुद्द्यांवर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये अद्याप अंतिम करार झालेला नाही. अशा स्थितीत त्याबाबतची कागदपत्रे तयार करण्यास वेळ लागू शकतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल अद्याप सौदी अरेबियात आहेत.


महत्त्वाच्या बातम्या