Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 68 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र दोन्ही देशातील संघर्ष अद्याप संपायचं नाव घेत नाही आहे. युद्धा थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. अशात आता युद्ध थांबण्यावर रशियाची भूमिका समोर आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितलं आहे की, रशिया विजय दिवसापर्यंत युद्धांच्या रणनितीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. 9 मे हा दिवस रशिया विजय दिवस मानला जातो. कारण या दिवशीच रशियाने दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जर्मनीचा पराभव केला होता. त्यामुशे 9 मेपर्यंत युक्रेन-रशिया युद्ध सुरुच राहणार आहे. मात्र, 9 मेनंतर युद्ध थांबण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.


9 मे रोजी रशिया घोषणा करण्याची शक्यता
रशिया युक्रेनसोबतचे युद्ध 9 मे रोजी संपवणार असल्याची चर्चा आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर 68 दिवसांनंतरही रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. युक्रेनमधील बहुतेक शहरांवर रशियाला अद्याप ताबा मिळवता आलेला नाही. 24 फेब्रुवारी रोजी जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर दावा केला होता की, केवळ ते सहा दिवसात रशिया युक्रेनचा पराभव करुन ताबा मिळवेल. मात्र, युक्रेनने युद्धात रशियाविरोधात खडतर लढा देताना दिसत आहे. अद्याप युक्रेनच्या सैन्याने रशियाविरोधात हत्यारं टाकलेली नाहीत. दुसरीकडे या युद्धामुळे रशियाला जागतिक पातळी फार नुकासान सहन करावं लागत आहे. तसेच पुतिन युद्धामुळे यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. परिणामी पुतिन युद्ध संपवण्याच्या विचारात असून लवकरच युद्धबंदीची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


रशिया विजयय दिवसाचं महत्त्व काय?
रशिया दरवर्षी 9 मे हा विजय दिवस म्हणून साजरा करतो. त्यामागचे कारण म्हणजे 9 मे रोजीच रशियाने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव केला. सध्या माध्यमांमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा आहे. 9 मे रोजी रशिया युद्धविराम जाहिर करु शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या