Pakistan Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना कधीही अटक होऊ शकते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी इम्रान खानसह 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्ष पीएमएल-एनच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, मदिना येथे जे काही घडले ते इम्रान खान यांच्या पक्षाच्या इशाऱ्यावर घडले. ईशनिंदा प्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मदिना येथे घोषणाबाजी प्रकरणी अटक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, या आठवड्यात सौदी अरेबियातील मदिना येथे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या शिष्टमंडळाविरोधात चोर-चोर असे नारे लागवण्यात आले होते. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सांगण्यावरून ही घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप आहे.
इम्रानसह या लोकांवर दाखल करण्यात आला गुन्हा
या प्रकरणी पाकिस्तानातील फैसलाबादमध्ये गेल्या शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान, त्यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी आणि माजी पंतप्रधान शाहबाज गुल शेख रशीद यांचे माजी सल्लागार, नॅशनल असेंब्लीचे माजी उपसभापती कासिम सुरी, लंडनमधील इम्रान खान यांचे जवळचे सहकारी अनिल मुसरत आणि साहिबजादा जहांगीर यांच्यासह 150 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इम्रान खान यांनी या प्रकरणी एका मुलाखतीत म्हटले आहे की, पवित्र स्थळावर कोणाला नारे देण्यास सांगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Boris Johnson JCB : भारतात जेसीबीवर फोटो काढण्यावरून वाद; ब्रिटनमध्ये PM जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी
- Ukraine Russia War : 67 व्या दिवशीही युद्ध सुरू, रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनच्या ओडेसा शहराचा रनवे उद्ध्वस्त
- PM Modi Europe Visit : 65 तास, 25 बैठका आणि 8 जागतिक नेत्यांशी चर्चा! PM मोदी आज पहाटे तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी रवाना