न्यूयॉर्क : अमेरिकेच्या कोविड 19 सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अमेरिकन डॉ. विवेक मूर्ती यांची निवड झाली आहे. या सल्लागार मंडळांचे तीन अध्यक्ष असणार आहेत. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांना ते सल्ला देतील. कोरोना महामारीने अमेरिकेत 2,36,000 नागरिकांचा बळी घेतला आहे. डॉ. मूर्ती पूर्वी अमेरिकेचे 'सर्जन जनरल' होते. डॉ. डेव्हिड केसलर आणि डॉ. मार्सेला नुनेझ स्मिथ या दोन अन्य सह-अध्यक्षांसह बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना विवेक मुर्ती कोरोना व्हायरसबाबत सल्ला देणाऱ्या सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या पथकाचे नेतृत्व करणार आहेत.
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक कहर अमेरिकेत पाहायला मिळत आहे. बायडन यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या साथीला हाताळणे ही आमच्या प्रशासनापुढील सर्वात महत्वाची लढाई आहे आणि तज्ञ मला सल्ला देतील. डॉ. विवेक मुर्ती हे अमेरिकेचे 19 वे "सर्जन जनरल" होते. 2014 ते 2017 या काळात त्यांनी या पदावर काम केले. तर डॉ. केसलर हे 1990 ते 1997 पर्यंत अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त होते.
Corona Vaccine Update | कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी, Pfizer कंपनीचा दावा
तर डॉ. नुनेझ स्मिथ येल विद्यापीठात इंटर्नल मेडिसिनच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. सल्लागार मंडळाच्या सदस्यांमध्ये भारतीय वंशाचे अतुल गावंडे, लुसियाना बोरिओ, रिक ब्राइट, एझिकेल ईमॅन्युएल, सेलिन गाऊंडर, ज्युली मोरिटा, मिशेल ऑस्टरहोलम, लॉयस पेस, रॉबर्ट रॉड्रिग्ज आणि एरिक गुस्बी यांचा समावेश आहे.
इतर बातम्या