मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरु असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाची लस कधी येणार? हा जगभरातील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. अशातच Pfizer या औषध कंपनीने दावा केला आहे की कोविड 19 लस 90 टक्के प्रभावी आहे. एक स्वतंत्र डेटा देखरेख समितीने केलेल्या विश्लेषणानुसार, Pfizer आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी होती. ज्यांना कोरोनाची लक्षणे आधी दिसत नव्हती त्यांच्यावर ही लस प्रभावी ठरली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. Pfizer कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये आमच्या लसीची कोविड -19 रोखण्याची क्षमता दिसली आहे.
जगभरात, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 50 कोटींच्या पार गेली आहे. कोविड 19 वर लक्ष ठेवून असणाऱ्या अमेरिकन युनिव्हर्सिटी 'जॉन हॉपकिन्स' च्या म्हणण्यानुसार, रविवारी जगातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण वाढून 5.2 कोटींच्या पार गेले आहेत. जगभरात कोरोना व्हायरसमुळे 12 लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत.
'जॉन हॉपकिन्स' विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसचे सर्वाधिक 98 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 2 लाख 37 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकर कोरोना लस येणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, लवकरच कोरोनावरील लस येणार आहे. लस 90 टक्के प्रभावी आहे. ही आनंदाची बातमी आहे.
संबंधित बातम्या