Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाहीये. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या आता पाच कोटींच्या वर पोहोचली आहे. रोज जगभरात पाच लाखांजवळ कोरोना रुग्ण समोर येत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळं जगभरात 12 लाख 61 हजार बळी गेले आहेत. मागील 24 तासात  4.69 लाख नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर  5762 लोकांचा मृत्यू मागील 24 तासात झाला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून त्यानंतर भारत फ्रांस, इटली, पोलांड, ब्रिटेन, रशियामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.


वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत  5 कोटी 7 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 57 लाख रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळं जगभरात 12 लाख 61 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 1 कोटी 36 लाखांवर पोहोचली आहे.


या दहा देशात सर्वाधिक रुग्ण
कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रकोप हा अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेत मागील 24 तासात  एक लाख एक हजार नवीन केसेस समोर आल्यात. तर भारतात आतापर्यंत 85 लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. मागील 24 तासात भारतात 46 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. तिसऱ्या ब्राझील असून तिथं मागील 24 तासात 10 हजार नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत.


अमेरिका:  कोरोनाबाधित -10,287,066, मृत्यू- 243,756
भारत:       कोरोनाबाधित - 8,553,864, मृत्यू- 126,653
ब्राझील:     कोरोनाबाधित - 5,664,115, मृत्यू- 162,397
फ्रांस:        कोरोनाबाधित - 1,787,324, मृत्यू- 40,439
रशिया:         कोरोनाबाधित - 1,774,334, मृत्यू- 30,537
स्पेन:         कोरोनाबाधित - 1,388,411, मृत्यू- 38,833
अर्जेंटीना:  कोरोनाबाधित - 1,242,182, मृत्यू- 33,560
यूके:          कोरोनाबाधित - 1,192,013, मृत्यू- 49,044
कोलंबिया: कोरोनाबाधित - 1,143,887, मृत्यू- 32,791
मॅक्सिको:   कोरोनाबाधित - 961,938, मृत्यू- 94,808


17 देशांमध्ये 5 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण
जगातील 17 देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 5 लाखांहून अधिक आहे. यात  इटली, पेरू, साउथ आफ्रीका, इराण, जर्मनी, पोलांड आणि चिली या देशांचाही समावेश आहे. जगातील सहा देशांमध्ये 60 टक्के लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. यात  अमेरिका, ब्राझिल, भारत, मॅक्सिको, ब्रिटेन, इटलीया देशांचा समावेश आहे. भारत सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर आहे. सर्वाधिक मृत्यूंच्या बाबतीत भारत तिसऱ्या नंबर आहे. भारतात आतापर्यंत 126,653 मृत्यू झाले आहेत.