Fact Check : सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला गेला आहे की, अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने आरटीपीसीआर चाचणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आरटीपीसीआर चाचणी कोविड19 चे अचूक निदान करत नाही. या नव्या व्हायरल दाव्यांमुळे आपटीपीसीआर चाचणीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र या व्हायरल पोस्ट मागचं सत्य काय हे आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.


इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये दावा करण्यात आली की, "अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने (CDC) कोविडसाठी पीसीआर चाचणीचा अधिकृत वापराचा निर्णय मागे घेतला आणि शेवटी कबूल केले की, आरटीपीसीआर चाचणी फ्लू आणि कोविड व्हायरसमध्ये फरक करू शकत नाही." 24 तासांपेक्षा कमी कालावधीत ही पोस्ट आणि या पोस्टचा स्क्रीनशॉट एक हजारहून अधिक वेळा शेअर आणि लाईक करण्यात आला. या संदर्भातील इतर पोस्टनाही अवघ्या काही तासांत शेकडो लाईक्स मिळाले. 


परंतू हा दावा वस्तुस्थितीला वाईट रीतीने मांडतो. तज्ज्ञांनी यूएसए टुडेला सांगितले की सीडीसीच्या पीसीआर चाचणीसाठी SARS-CoV-2 आणि इन्फ्लूएंझा विषाणू गोंधळात टाकणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. सीडीसीने घोषित केले की, 31 डिसेंबरनंतर एजन्सी-विकसित PCR चाचणीसाठी आपत्कालीन वापर अधिकृततेची विनंती मागे घेईल. मात्र याच कारण म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाने सीडीसी सारख्या इतर शेकडो कोविड विशिष्ट चाचण्या अधिकृत केल्या आहेत. इतर उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने पीसीआर चाचणी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


या प्रकरणात इनोव्हेटिव्ह जीनोमिक्स इन्स्टिट्यूटचे कोविडचे वैद्यकीय संचालक डॉ. पेट्रोस गियानिकोपौलोस यांच्या मते, ''CDC ची पीसीआर चाचणी केवळ SARS-Cov-2 ओळखण्यासाठी केली गेली असल्याने, ती इन्फ्लूएंझासारख्या दुसर्‍या विषाणूचे अनुवांशिक अनुक्रम शोधू किंवा गोंधळात टाकू शकत नाही.''


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha