Daniel Craig : जेम्स बॉंड या जगप्रसिदध गुप्तहेराची भूमिका तब्बल पाच चित्रपटांच्या माध्यमातून निभावणाऱ्या डॅनियल क्रेगला खऱ्या गुप्तहेरांसाठी देण्यात येणाऱ्या 'कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अॅन्ड सेंट जॉर्ज- सीएमजी' (Companion of the Order of St. Michael and St. George -CMG) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार ब्रिटिशांसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुप्तहेरांसाठी दिला जातो. पण डॅनियल क्रेगला हा पुरस्कार देण्यात आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. ब्रिटनच्या प्रशासनाकडून आज या पुरस्काराची घोषणा केली आहे.
डॅनियल क्रेग (वय 52) यांना हा पुरस्कार 'चित्रपट आणि थिएटर'मध्ये दिलेल्या योगदानासाठी देण्यात येणार आहे. डॅनियल क्रेग यांचा जेम्स बॉंडपटातील शेवटचा चित्रपट असलेल्या 'नो टाईम टू डाय' (No Time To Die) काही महिन्यांपूर्वीचं प्रदर्शित झाला आहे. डॅनियल क्रेग यांना हा पुरस्कार ब्रिटनच्या राणीच्या हस्ते देण्यात येईल.
'कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अॅन्ड सेंट जॉर्ज- सीएमजी' हा पुरस्कार ब्रिटिश सरकारकडून दरवर्षी देण्यात येतो. हा पुरस्कार खऱ्या आयुष्यात देशासाठी गुप्तहेराचं काम केलेल्या व्यक्तीला देण्यात येतो. पण आता हा पुरस्कार चित्रपटातील गुप्तहेराची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला जाहीर झाल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही या पुरस्काराची चांगलीच चर्चा सुरु आहे.
ख्रिस व्हिट्टी, जॉर्ज स्मिथ आणि फ्रँक अॅथेरटॉन यांना मानाचा 'नाईटहूड' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सन 1962 साली पहिला बाँडपट प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत एकूण 27 चित्रपट प्रदर्शित झाले असून 'नो टाईम टू डाय' (No Time To Die) हा शेवटचा बॉंडपट आहे. डॅनियल क्रेग यांनी पाच बॉंडपटात काम केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :