Trending News : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या एका व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नोटांचा पाऊस पडत आहे. हे पैसे गोळा करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे.
एका इमारतीवरून पैसे उडत येत आहेत आणि त्या इमारती खाली उभे असलेले लोक पैसे गोळा करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा पैशांचा पाऊस पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ billycorben नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 34 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. एका यूझरने या व्हिडीओला कमेंट केली, 'कृपया मला या पैशांमधील 10 कोटी रूपये दान करा. मला मृत्यू पूर्वी माझी सर्व स्वप्न पूर्ण करू करायची आहेत. '
अशीच घटना काही दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये घडली होती. अचानक एका ट्रकमधून पैसे उडत रस्त्यावर पडले आणि ते पैसे गोळा करायला लोकांनी गर्दी केली होती. कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल विभागाने (CHP) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कार्लसबॅडमधील इंटरस्टेट-5 या महामार्गावर घडली होती. एका ट्रकमधील कॅश रस्त्यावर उडून आली आणि तिथले लोक गाडीमधून उतरून ती कॅश गोळा करण्यासाठी जमा झाले होते. त्यामुळे महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha