एक्स्प्लोर
दिवाळी सणावर अमेरिकेचे पोस्ट तिकीट
न्यूयॉर्क: अमेरिकेतील भारतीय आणि सिनेटर्सच्या सात वर्षांच्या अथक प्रयत्नामुळे अमेरिका यावर्षी दिवाळीनिमित्त खास पोस्टाचे तिकीट प्रकाशित करणार आहे. दिवाळीच्या या मंगलदिनी अमेरिकेने घेतलेल्या या निर्णायाचे सर्वच भारतीयांनी स्वागत केले आहे.
या विशेष तिकीटाचे 5 ऑक्टोबर रोजी लोकार्पण होणार आहे. या तिकीटामध्ये चमकत्या पृष्ठभूमीवर पारंपारिक पणतीचे चित्र असेल. तसेच त्यावर 'फॉरएव्हर यूएस 2016' असे लिहिले असेल.
न्यूयॉर्कच्या काँग्रेस सद्स्या कॅरेलिन मेलोनी यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, ''अमेरिकन पोस्ट सेवा (USPS) दिव्यांचा सण दिपावलीचे महत्त्व वाढवण्यासाठी नोव्हेंबरमध्ये हे तिकीट प्रकाशित करणार आहे. यासाठी USPS च्या सॅली अॅन्डर्सन ब्रूस कनेक्टिकटने दिव्यांचे फोटो घेतले आहे. या तिकीटाचे डिझाईन तयार करण्याची जबाबदारी व्हर्जिनियाच्या ग्रेग ब्रीडिंगने वॉशिंग्टनच्या विलियम गिकरकडे सोपवली आहे.
मेलोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''या तिकीटाच्या लोकार्पणासाठी गेले कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. भारतीयांसाठी दिवाळीचा सण अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सण आहे. मात्र, त्याची दखल घेऊन असे कोणतेही तिकीट प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. पण अमेरिकेतील भारतीयांच्या मागणीनुसार अमेरिकन सरकारने आता तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.''
या तिकीटासंबंधी अमेरिकन पोस्ट विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अमेरिकेत वसलेल्या भारतीय नागरिकांची दिवाळीच्या सणावरील एक तिकीट असावे अशी मागणी होती. त्यानुसार अमेरिकन पोस्ट विभाग हे तिकीट 5 ऑक्टोबर रोजी भारतीय दूतावासात पहिल्यांदा प्रकाशित करणार आहे, असे USPS कडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, आजपर्यंत अमेरिकन डाक विभागाच्यावतीने जगातील एकमेव हिंदू धर्मावर अधारित कोणतेही तिकीट प्रकाशित केले नव्हते.पो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement