एक्स्प्लोर

US vs Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ला का रोखला? आता पुढे काय होणार? जाणून घ्या A टू Z माहिती

US vs Iran Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होणारे लष्करी हल्ले रोखण्याचे आदेश दिले आहेत.

US vs Iran Conflict: गेल्या अनेक महिन्यांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पश्चिम आशियातून (West Asia) आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर होणारे संभाव्य लष्करी हल्ले रोखण्याचे आदेश दिले आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी अमेरिकेने तयार केलेल्या शांतता कराराला मंजुरी दिली असल्याचा मोठा दावा ट्रम्प यांनी केला आहे. याच आठवड्याच्या शेवटी युरोपमधील एका देशात या ऐतिहासिक करारावर अधिकृत स्वाक्षरी होणार असल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या प्रसंगी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस (JD Vance) उपस्थित राहतील, मात्र इराणतर्फे यात कोण सहभागी होणार हे अद्याप अनिश्चित आहे.

28 फेब्रुवारी 2026 रोजी इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात थेट संघर्ष (Conflict) सुरू झाला होता. तब्बल 40 दिवसांच्या भीषण लढाईनंतर तात्पुरती युद्धबंदी (Temporary Ceasefire) जाहीर झाली होती. मात्र, नुकतेच पुन्हा एकदा एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती. ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली होती की, जर या करारावर स्वाक्षरी झाली नाही, तर इराणचे मुख्य तेल केंद्र असलेल्या 'खार्ग बेटावर' (Kharg Island) अमेरिका ताबा मिळवेल. या आर्थिक आणि लष्करी दबावानंतर अखेर इराण नरमल्याचे चित्र आहे.

या कराराला सौदी अरेबिया, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, कतार, तुर्की, बहरीन, कुवेत, जॉर्डन आणि इजिप्त या देशांनीही मान्यता दिली आहे. मात्र, हा करार पूर्ण होईपर्यंत होर्मुजच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) नौदलाची नाकेबंदी कायम राहणार आहे.

US and Israel Demands : अमेरिका आणि इस्रायलच्या अटी  

1. इराणने आपला आण्विक कार्यक्रम पूर्णपणे मोडीत काढावा.

2. समृद्ध युरेनियमचा साठा अमेरिकेकडे सोपवावा.

3. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम कायमचा बंद करावा.

4. हिजबुल्ला, हूती आणि हमास सारख्या संघटनांना मिळणारा निधी व पाठिंबा थांबवावा.

Iran Demands: इराणच्या अटी 

1. अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध मागे घ्यावेत.

2. परदेशात जप्त केलेली इराणची मालमत्ता आणि निधी मुक्त करावा.

3. इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले तातडीने थांबवावेत.

4. भविष्यात इराणवर हल्ला होणार नाही, याची लिखित हमी द्यावी.

G7 Summit in France: पुढे काय होणार? G7 शिखर परिषदेकडे जगाचे लक्ष

ट्रम्प यांनी अद्याप कराराचा अंतिम मसुदा जाहीर केला नसला तरी, फ्रान्समध्ये 15 ते 17 जून दरम्यान होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत (G7 Summit in France) यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी या परिषदेसाठी मध्य पूर्वेतील (Middle East) अनेक देशांना विशेष निमंत्रण दिले आहे.

दरम्यान, अनेक दशकांपासून एकमेकांचे कट्टर शत्रू राहिलेले इस्रायल आणि इराण खरोखरच शांततेसाठी तयार झाले आहेत का? अमेरिकेचा हा शांतता करार पश्चिम आशियात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या आठवड्याअखेर युरोपमध्ये होणाऱ्या स्वाक्षरीनंतरच स्पष्ट होतील. जागतिक स्तरावर या घडामोडींवर संरक्षण विश्लेषक बारीक लक्ष ठेवून आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget