एक्स्प्लोर

अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात शक्तिशाली बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकन मिलीट्रीने अफगाणिस्तानवर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील आयसिस स्टेटमध्ये अमेरिकेने हा हल्ला केल्याचं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकन फायटर MC-130 च्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या नांगरहार भागातील आयसिसच्या गुहांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता हा हल्ला करण्यात आला. आयसीसचा सुळसुळाट असलेल्या भागात अमेरिकेने हल्ला केला. MOAB (Mother Of All Bombs) हा जगातील सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र विरहीत बॉम्ब अमेरिकेने वापरला आहे. आयसीसचे अड्डे उद्ध्वस्त करणं या हल्ल्यामागचा उद्देश असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकन सैन्य सध्या अफगाणिस्तानातील नुकसानीची पाहणी करत आहे. MOAB चा वापर जगात पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. MOAB म्हणजे ‘Mother of All Bombs’ हा जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब म्हणून ओळखला जातो. याला GBU-43/B या नावाने ओळखलं जातं. 11 टन वजनाची शस्त्रे या MOAB असून याचं वजन 9 हजार 797 किलो म्हणजे जवळपास 100 टन एवढं असल्याचं बोललं जातं. वायू दलाने हा बॉम्ब 2003 साली तयार केला, पण आतापर्यंत याचा वापर कधीही करण्यात आला नव्हता. अमेरिकेचं सैन्य मुख्यालय असलेल्या पेंटागनने या हल्ल्यानंतर माध्यमांना माहिती दिली. अमेरिकन फायटर MC-130 च्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या नांगरहार भागातील आयसिसच्या गुहांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. यामध्ये किती दहशतवादी मारले गेले याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही, अशी माहिती पेंटागनचे प्रवक्ते अॅडम स्टंप यांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या बॉम्बहल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याचं अभिनंदन केलं आहे. काय आहे MOAB ? MOAB म्हणजे  'Mother of All Bombs' हा जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब म्हणून ओळखला जातो. याला GBU-43/B या नावाने ओळखलं जातं. 11 टन वजनाची शस्त्रं वाहण्याची क्षमता MOAB मध्ये असून याचं वजन 9 हजार 797 किलो म्हणजे जवळपास 100 टन इतकं असल्याची माहिती आहे. गुहा किंवा बंकर यासारखी भूमिगत ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी मुख्यत्वे हा बॉम्ब वापरला जातो. अमेरिकन वायुदलाने या बॉम्बची पहिली चाचणी 2003 साली केली होती, पण आतापर्यंत याचा वापर कधीच करण्यात आला नव्हता. अफगाणिस्तानमधील आयसिसची ठिकाणं उद्ध्वस्त करणं अमेरिकेचा उद्देश होता. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे अनेक जवान गेल्या काही दिवसात मारले गेले होते. त्यानंतर अमेरिकेने हे कठोर पाऊल उचललं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget