एक्स्प्लोर
Advertisement
ट्रम्प प्रशासनाचा दणका, एकापेक्षा अधिक व्हिजाचे अर्ज रद्द
अमेरिकेत काम करणाऱ्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनानं दणका दिला आहे. कारण, एकापेक्षा अधिक व्हिजासाठी अर्ज केल्यास, ते रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत काम करणाऱ्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनानं दणका दिला आहे. कारण, एकापेक्षा अधिक व्हिजासाठी अर्ज केल्यास, ते रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांमध्ये एच 1 बी व्हिसा अतिशय लोकप्रिय आहे. पण ट्रम्प प्रशासनाच्या नवीन व्हिसा धोरणामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा फटका बसणार आहे.
अमेरिकेच्या यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसची व्हिसा प्रक्रिया 2 एप्रिल पासून सुरु होणार आहे. पण 1 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षासाठी हा व्हिसा दिला जाईल.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसासाठी ज्या व्यक्ती एकापेक्षा अधिक अर्ज करत आहेत, ते यातील लॉटरी प्रक्रियेत अडचणी निर्माण करत आहेत.
अमेरिकेच्या इमिग्रेशन काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार, एच 1 बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला काम करण्याचा व्हिसा देण्याची तरतूद रद्द करण्यात येणार आहे.
वास्तविक, ओबामा सरकारच्या कार्यकाळात 2015 मध्ये एच 1 बी व्हिसा मिळालेल्या व्यक्तींला त्याच्या जोडीदारांलाही तशाच प्रकारचा काम करण्याचा व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. पण विद्यमान ट्रम्प प्रशासनाने ही प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार, 2010 ते 2016 दरम्यान एच 1 बी व्हिसा धारकांना टेक्सास आणि पूर्व किनारपट्टीच्या शहरांत रोजगाराच्या संधी मिळतात. वास्तविक, एच 1 बी व्हिसा धारकांना सिलिकॉन व्हॅलीत रोजगाराच्या संधी मिळणं अपेक्षित होतं.
पण त्याच्या विपरित हे घडत, असल्याने एच 1 बी व्हिसा संदर्भातील निर्णय कडक करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतल्याचे बोलले जात होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
Advertisement