Titan Submarine Explosion : टायटॅनिक (Titanic) पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊन त्यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जगातील पाच अब्जाधीशांचा मृत्यू झाला आहे. अटलांटिक महासागरात अपघातग्रस्त टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन ओशनगेट एक्स्पिडिशन्स सबमर्सिबल (Titan Oceangate Expeditions Submersible) ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतर गुरुवारी, 22 जून रोजी सकाळी अटलांटिक समुद्रात पाणबुडीचे अवशेष आढळून आले. टायटन पाणबुडीचा स्फोट झाल्याची माहिती अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांनी दिली. टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांजवळच टायटन पाणबुडी अवशेष आढळून आले. पाणबुडीच्या स्फोटामागचं नेमकं कारण काय, हे आता समोर आलं आहे.


टायटॅनिक जहाजाजवळच सापडले टायटन पाणबुडीचे अवशेष


समुद्रात टायटॅनिक जहाजाच्या ढिगाऱ्याच्या जवळ टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. कॅनडाने रिमोट ऑपरेटेड यूएव्ही म्हणजे ड्रोनप्रमाणे दिसणाऱ्या एका यंत्राच्या साहाय्याने अवशेष जप्त केले आहेत. टायटन पाणबुडीच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या ओशनगेट या कंपनीनेसुद्धा बाब स्पष्ट केली आहे. ही दुर्घटना घडली कशी घडली आणि टायटन पाणबुडीत स्फोट कसा झाला, यामागचं कारण शोधण्यात आलं आहे.


टायटन पाणबुडीचा स्फोट नेमका कशामुळे?


तज्ज्ञांच्या मते, टायटन पाणबुडीचा स्फोट कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन (Catastrophic Implosion) होऊन असल्याचं सांगितलं जात आहे. यानुसार, पाणबुडीच्या आतमध्ये काही घटना घडली ज्यामुळे पाणबुडीने सुरळीत काम करणं बंद पडलं. यामुळे पाणबुडीचं नुकसान झालं आणि ती टायटॅनिक जहाजाजवळच बुडाली, असं म्हटलं जात आहे. आता कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्या.


कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन म्हणजे काय?


कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये पाणबुडीच्या आतील भागात इतका दबाव वाढतो आणि ती खराब होते आणि नंतर काम करणं थांबवतं. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बंदिस्त जागेवर जास्त दाब आल्यावर अशी परिस्थिती उद्भवते आणि पाणबुडीमध्ये तो दबाव हाताळण्याची क्षमता नसेल तर त्याचा अंतर्गत स्फोट होतो. 


सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, समुद्रामध्ये पाण्याचा दबाव असतो. पाण्याची खोलीनुसार, हा दबाव वाढत जातो. टायटन पाणबुडी पाण्याच्या आत गेली तेव्हा ती बंदीस्त असल्यामुळे त्यावर बाहेरच्या पाण्याचा दबाव वाढला. हा दबाव पाणबुडीच्या आतील दबावापेक्षा जास्त होता. परिणामी हा दाब पाणबुडी सहन करु शकली नाही आणि त्यामध्ये अंतर्गत स्फोट झाला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Titanic Submarine : बेपत्ता टायटन पाणबुडीतील 'त्या' 5 जणांचा मृत्यू; स्फोटानंतर सापडले अवशेष