PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 21 जूनपासून त्यांचा अमेरिकेचा दौरा सुरु झाला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या या अमेरिका दऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (Antony Blinken) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लंचचे आयोजन केले होते. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत. या संबंधांमुळेच ही वीन अधिक घट्ट झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कमला हॅरिस यांचे काम जगभरातील महिलांसाठी एक मोठी प्रेरणा असल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी दिला आठवणींना उजाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे भारताशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या आई डॉ. श्यामला गोपालन 1958 मध्ये भारतातून अमेरिकेत आल्या होत्या. त्यावेळी बहुतांश लोकांकडे फोन नव्हते. त्यामुळं त्यांची आई तिच्या कुटुंबातील सदस्यांना हाताने लिहून पत्रे पाठवत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कमला हॅरिस यांच्या आईने भारतासोबतचे संबंध कधीच तुटू दिले नाहीत. त्यांनी देशासोबत संबंध कायम ठेवले. भारताला अमेरिकेतील जीवनाशी सतत जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हजारो मैलांचे अंतर असूनही भारत नेहमीच त्याच्या जवळ होता असे पंतप्रधान म्हणाले. कमला हॅरिस यांची कामगिरी ही केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर भारतातील आणि जगभरातील महिलांसाठी एक मोठी प्रेरणा असल्याचे मोदी म्हणाले.
पृथ्वी असो वा आकाश, समुद्राची खोली असो की अवकाशाची उंची यामध्ये भारत आणि अमेरिका एकत्र काम करत आहेत. याचा मला अभिमान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे सर्वांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानत असल्याचे पंतप्रदान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांच्या कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या.
तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित राहिल्याने मला आनंद
माझ्या भव्य स्वागताबद्दल मी उपराष्ट्रपती कमला हॅरिस, परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांचे आभार मानतो. तुम्ही दोघांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित राहिल्याने मला आनंद झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
भारत-अमेरिका यांच्यातील मैत्री आणि सहकार्य अधिक घट्ट
गेल्या तीन दिवसांत मी अनेक बैठकांमध्ये भाग घेतला. अनेक विषयांवर चर्चा केली. या सर्व भेटींमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणि सहकार्य अधिक घट्ट झाली पाहिजे. याबाबत सर्वांचे एकमत होते.
महत्त्वाच्या बातम्या :