PM Shehbaz Sharif Viral: आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) अडचणी काही केल्या कमी व्हायच नाव घेत नाही आहेत. पाकिस्तानच्या मदतीसाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना आखण्यात येत आहेत. पंरतु पाकिस्तानची परिस्थिती काही केल्या सुधारत नसल्याचं दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे गुरुवारी (22 जून) रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या न्यू ग्लोबल फायनान्सिंग पॅक्ट या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचले. यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांची देखील भेट घेतली. 


यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमुळे सध्या त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर अनेक सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहेत. या व्हिडिओमध्ये, नियमांनुसार एक महिला अधिकारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना त्यांच्या गाडीजवळ त्यांनी घेण्यासाठी पोहचली. त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे त्यामुळे शाहबाज शरीफ यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली. 


म्हणून शहबाज शरीफ यांचा व्हीडिओ व्हायरल 


जेव्हा शाहबाज शरीफ पोहचले तेव्हा त्याठिकाणी जोरदार पाऊस सुरू होता. त्यावेळी एक महिला अधिकारी त्यांच्यासाठी छत्री घेऊन आली. तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या हातातून ती छत्री काढून घेतली आणि ते पुढे चालू लागले. यानंतर ते ती महिला अधिकारी भिजत आतमध्ये जाताना कॅमेरामध्ये कैद झाली. पंतप्रधान शरीफ यांचा हाच व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. तसेच शाहबाज शरीफ यांनी त्या महिलेच्या हातातून छत्री हिसकावून घेतली असं देखील सांगण्यात येत आहे. तसेच युजर्सने त्यांच्यावर अनेक प्रकारच्या कमेंट्स देखील केल्या आहेत. 






हा व्हिडिओ पाहून शाहबाज शरीफ यांच्यावर अनेक प्रकारच्या नकारात्मक टीका करण्यात येत आहे. तर काही लोकांनी पाकिस्तानच्या या आर्थिक परिस्थितीला शाहबाज शरीफ यांनाच कारणीभूत ठरवले. परंतु शाहबाज शरीफ यांच्याकडून अजूनही देश आर्थिक संकटातून बाहेर येईल असा आशावद व्यक्त करण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Titanic submarine : बेपत्ता टायटन पाणबुडीतील 'त्या' 5 जणांचा मृत्यू; स्फोटानंतर सापडले अवशेष